मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
By सचिन लुंगसे | Updated: May 6, 2025 22:37 IST2025-05-06T22:37:06+5:302025-05-06T22:37:40+5:30
Rain In Mumbai News: ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना उन्हाचे चटके बसत असतानाच हवामानात झालेल्या बदलानंतर मंगळवारी रात्री साडेनऊनंतर मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. पश्चिम रेल्वे मार्गावर दहिसर आणि कांदिवली दरम्यान वादळी वारे आणि पाऊस सुरू असताना ओव्हर हेड वायरवर उडून आलेल्या कपड्यामुळे लोकल खोळंबली होती.

मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
- सचिन लुंगसे
मुंबई - ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना उन्हाचे चटके बसत असतानाच हवामानात झालेल्या बदलानंतर मंगळवारी रात्री साडेनऊनंतर मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. पश्चिम रेल्वे मार्गावर दहिसर आणि कांदिवली दरम्यान वादळी वारे आणि पाऊस सुरू असताना ओव्हर हेड वायरवर उडून आलेल्या कपड्यामुळे लोकल खोळंबली होती. रात्री दहा वाजता आलेल्या या अडचणीमुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल १५ मिनिटे उशिराने धावत होत्या.तर मध्य रेल्वे मार्गावरही कल्याण कसा-यादरम्यान ओव्हर हेड वायरमध्ये बिघाड झाला होता. परिणामी मध्य रेल्वे मार्गावरील लोकलची वाहतूक विलंबाने सुरु होती.
पश्चिम उपनगरात बोरीवली, कांदिवली, गोरेगाव, दहिसर, पवई, जोगेश्वरीसह पुर्व उपनगरात विक्रोळी, कांजुरमार्ग लगतच्या परिसरात पावसाने हजेरी लावली होती. रात्री दहाच्या दरम्यान वांद्रे, वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ल्यासह अंधेरी, विलेपार्ले परिसरातही पावसाने हजेरी लावली. पावसासोबतच जोरदार वारे सुटल्याने ऐन रात्री घरी परतणा-या चाकरमान्यांचे हाल झाले.