Join us
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण मुंबईत ढगांच्या कडकडाटासह पाऊस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 21:24 IST

मुंबईतील काही ठिकाणी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली.

मुंबई - दक्षिण मुंबईत ढगांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. विजेचा लखलखाट आणि ढगांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. ऑक्टोबर हिटने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. आज सायंकाळी हवामान ढगाळलेले असेल आणि काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मुंबईतील काही ठिकाणी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली.

टॅग्स :मुंबईपाऊस