Join us  

रेल्वेने ६४ हजार टन जीवनावश्यक सामग्रीची केली वाहतूक 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 7:16 PM

लॉकडाऊन काळात पश्चिम रेल्वे प्रशासनाने जीवनावश्यक सामग्रीची वाहतूक सुरु होती. त्यामुळे पश्चिम रेल्वेने मागील तीन महिन्यात ६४ हजार टन जीवनावश्यक सामग्रीची वाहतूक देशभरात केली आहे. 

 

मुंबई : लॉकडाऊन काळात पश्चिम रेल्वे प्रशासनाने जीवनावश्यक सामग्रीची वाहतूक सुरु होती. त्यामुळे पश्चिम रेल्वेने मागील तीन महिन्यात ६४ हजार टन जीवनावश्यक सामग्रीची वाहतूक देशभरात केली आहे.  दरम्यान, रेल्वेचा लॉकडाऊन १२ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आला आहे. मात्र रेल्वे प्रशासनाद्वारे होणारी जीवनावश्यक सामग्रीच्या वाहतूक अखंड सुरु राहणार आहे. पश्चिम रेल्वेने यासाठी तयारी सुरु आहे. लॉकडाऊनमध्ये पश्चिम रेल्वेने ३५९ पार्सल गाड्यांद्वारे ६४ हजार टन सामग्रीची वाहतूक केली आहे. यामधून पश्चिम रेल्वेला २० कोटी ४६ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.

जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सामग्री, शेतीतील माल वेळेत ग्राहकांपर्यत पोहोचविण्यासाठी भारतीय रेल्वेची मालगाडी, पार्सल सेवा, रो रो सेवा सुरू आहे.  फळ, भाजीपाला, दूध व दुग्धजन्य पदार्थ आणि बी-बियाणे यासह नाशवंत वस्तूंसाठी रेल्वेने पार्सल स्पेशल ट्रेनचे मार्ग निश्चित केले आहेत. त्यानुसार अन्नधान्य,पदार्थ पोहोचविण्यात येत आहेत. यासाठी रेल्वेने पहिल्यांदाच वेळापत्रक तयार केले आहे. पश्चिम रेल्वेने २३ मार्च पासून ते २४ जूनपर्यंत  ७ हजार ३०९ मालगाड्यांच्या आधारे १५.११ मिलियन टन मालाची ने-आण केली आहे.लॉकडाउन काळातील पार्सल वाहतुकीमधुन पश्चिम रेल्वेला २० कोटी ४६ लाख रुपयांचे महसूल मिळाला आहे. यामध्ये सर्वाधिक ४८ दुध विशेष गाड्यांमधून ६ काेटी १८ लाख रुपयांचा महसूल तिजाेरीत जमा झाला आहे. कोरोना विशेष ३०५ गाड्यांच्या वाहतुकीतुन १२ काेटी ९४ लाख रुपयांची भर पडली आहे.

 

कोरोना विषाणूमुळे घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय, लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस बंद आहेत. परिणामी, पश्चिम रेल्वेला १ हजार ४५७ कोटीचे नुकसान झाले आहे. यामध्ये उपनगरीय रेल्वेला २१० काेटी ४३ लाखांचा ताेटा झाला आहे. पश्चिम रेल्वेने ३६३ कोटी ७२ लाख रुपये किमतींच्या ५५ लाख ७२ हजार प्रवाशांंचा तिकिटांचा परतावा दिला आहे. यापैकी मुंबई विभागात १७१ काेटी ४५ लाख रुपयांचा रिफंड देण्यात आला आहे.

टॅग्स :रेल्वेकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस