Join us
Daily Top 2Weekly Top 5

इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 06:31 IST

मुंबईतून रोज लाखो प्रवासी भारताच्या विविध भागांमध्ये पर्यटन आणि कामानिमित रेल्वेसोबतच विमानाने प्रवास करतात. विमान प्रवास जलद असला तरी आता त्याचा गोंधळ सुरू असल्याने रेल्वेकडे प्रवाशांचा कल वाढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई : इंडिगो विमान सेवेची मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांच्या सुविधेसाठी भारतीय रेल्वेने एकूण ३७ ट्रेनमध्ये ११६ अतिरिक्त डबे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने विशेष ट्रेनच्या १४  फेऱ्या आणि पश्चिम रेल्वेने ७ विशेष ट्रेनच्या माध्यमातून ३५ फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तर पश्चिम रेल्वेने प्रामुख्याने मुंबई-दिल्ली मार्गावर आणि मध्य रेल्वेने मुंबईमधून दिल्लीसह मडगाव, नागपूर, बंगळुरू, लखनौ, गोरखपूर दरम्यान ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतून रोज लाखो प्रवासी भारताच्या विविध भागांमध्ये पर्यटन आणि कामानिमित रेल्वेसोबतच विमानाने प्रवास करतात. विमान प्रवास जलद असला तरी आता त्याचा गोंधळ सुरू असल्याने रेल्वेकडे प्रवाशांचा कल वाढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर ६ डिसेंबरपासून  विशेष ट्रेनचे नियोजन केल्याचे ते म्हणाले.  पश्चिम रेल्वेने  त्यांच्या चार मोठ्या मागणी असलेल्या ट्रेनमध्ये थर्ड आणि सेकंड एसीचे डबे वाढवले आहेत. तर दोन्ही रेल्वे मार्गांवरील विशेष ट्रेनमध्ये एसी फर्स्ट क्लास, एसी टू-टियर, एसी थ्री-टियर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड वर्गाचे डबे असणार आहेत.

पश्चिम रेल्वेच्या विशेष ट्रेनचे वेळापत्रक

मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली ७ डिसेंबर रात्री ८:२०

मुंबई सेंट्रल-भिवानी सुपरफास्ट

(९ ते ३० डिसेंबर) मंगळवार आणि शुक्रवार सकाळी १०:३० वाजता

भिवानी-मुंबई सेंट्रल स्पेशल

(१० ते ३० डिसेंबर) बुधवार आणि शनिवार दुपारी २:३५

मुंबई सेंट्रल-शूर बस्ती,

७ आणि ८ डिसेंबर रोजी

सकाळी १०:३०  वाजता

वांद्रे टर्मिनस-दुर्गापुरा ८  डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता

मध्य रेल्वेच्या ट्रेनचे वेळापत्रक

लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)-मडगाव ७ आणि ८ डिसेंबर रोजी सकाळी ११.१० वाजता

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)-नागपूर ७ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता

एलटीटी-हैदराबाद ७ डिसेंबर रोजी दुपारी ५.२० वाजता

पुणे-हजरत निजामुद्दीन (दिल्ली) ७ डिसेंबर रोजी रात्री ८.२० वाजता

एलटीटी-बिलासपूर  १२ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजता

एलटीटी-गोरखपूर ९  डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता

एलटीटी-सियालदह ९ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता

सीएसएमटी-हावडा ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता

English
हिंदी सारांश
Web Title : Railways Add Coaches, Run Special Trains Amid Indigo Flight Cancellations

Web Summary : Indian Railways adds 116 coaches to 37 trains and starts 49 special trips due to Indigo flight cancellations. Western Railway focuses on Mumbai-Delhi routes, while Central Railway covers Delhi, Madgaon, Nagpur, and other destinations. Special trains include AC and general class coaches.
टॅग्स :रेल्वेइंडिगो