Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Local Mega Block: दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 18:12 IST

Mumbai Local Mega Block on Sunday: दर रविवारी सुट्टीच्या दिवशी रेल्वेकडून मेगाब्लॉक घेऊन रखडलेली कामे अथवा दुरुस्ती करण्यात येते.

मुंबई - दुरुस्ती आणि अन्य कामांसाठी तिन्ही उपनगरीय रेल्वे मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान पाच आणि सहाव्या मार्गिकांवर तसेच ठाणे आणि वाशी /नेरूळ स्थानकांदरम्यान अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होणार आहे. 

मध्य रेल्वे मेगा ब्लॉक (Central Line Mega Block)विद्याविहार आणि ठाणे दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर सकाळी  ८ ते दुपारी १ पर्यंतपरिणाम : १४ मेल / एक्स्प्रेस जलद मार्गावर. त्या १० ते १५ मिनिटांच्या उशिराने धावतील.  

ट्रान्स हार्बर मेगा ब्लॉक (Trans-Harbour Mega Block)ठाणे आणि वाशी / नेरूळ दरम्यान अप व डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत  परिणाम : वाशी / नेरूळ आणि ठाणे दरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पश्चिम रेल्वे मेगा ब्लॉक (Western Line Mega Block)चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत परिणाम : अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सेवा जलद मार्गावर वळविणार.

English
हिंदी सारांश
Web Title : Rail Mega Block for Repair Work: Travel Disruptions on Sunday

Web Summary : Sunday sees a rail mega block on Central, Trans-Harbour, and Western lines for maintenance. Expect delays and cancellations, especially on Trans-Harbour. Western line slow services will divert to fast tracks.
टॅग्स :मुंबई लोकल मेगा ब्लॉकमुंबई लोकलरेल्वेमध्य रेल्वेहार्बर रेल्वेपश्चिम रेल्वेलोकलमुंबई ट्रेन अपडेट