मुंबई : पश्चिम रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढविण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलात (आरपीएफ) सहा नवीन सेगवे वाहने दाखल झाली आहेत. यामुळे आरपीएल दलातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना फेरफटका, मदतकार्य करणे सोपे होईल. सेगवेद्वारे स्थानकाची पाहणी करता येईल. आपत्कालीन स्थितीत मदतकार्य वेळेत पोहोचविण्यासाठी ही वाहने महत्त्वाची ठरतील. पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक ए. के. गुप्ता यांनी प्रजासत्ताक दिनी चर्चगेट स्थानकावर या सहा सेगवे वाहनांचे उद्घाटन केले.पश्चिम रेल्वेवरील आरपीएफकडे बॅटरीवर चालणारी ही सहा वाहने देण्यात आली आहेत. गर्दीची स्थानके म्हणून ओळखल्या जाणाºया चर्चगेट, मुंबई सेंट्रल, अंधेरी, बोरीवली या स्थानकांवर प्रत्येकी एक सेगवे वाहन चालविण्यात येत आहे. तर वांद्रे टर्मिनस येथे दोन सेगवे वाहने चालविण्यात येत आहेत. लवकरच आणखी पाच सेगवे वाहने पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल होतील. ती वांद्रे स्थानक, गोरेगाव, मालाड, विरार, सुरत या स्थानकांवर प्रत्येकी एक याप्रमाणे चालविण्यात येतील.पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले की, सेगवेद्वारे उपनगरीय रेल्वे स्थानकांवर रेल्वे सुरक्षा दलातील अधिकारी आणि कर्मचारी आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य पोहोचवू शकतात. या वाहनांमुळे वाहनांवरील अधिकाºयांना स्थानकावरील प्रत्येक गोष्टीचे बारकाईने निरीक्षण करता येईल. सुरक्षा दल अधिक बळकट होईल.
रेल्वे सुरक्षा दल होणार आणखी बळकट; पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात सहा नवी वाहने
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 05:22 IST