“अमृत भारत स्टेशन योजनेत ठाणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार”: अश्विनी वैष्णव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 23:33 IST2025-04-11T23:30:33+5:302025-04-11T23:33:05+5:30

Railway Minister Ashwini Vaishnaw: ठाणे जिल्ह्यातील कोणत्या स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे? जाणून घ्या...

railway minister ashwini vaishnaw said amrit bharat station scheme will transform railway stations in thane district | “अमृत भारत स्टेशन योजनेत ठाणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार”: अश्विनी वैष्णव

“अमृत भारत स्टेशन योजनेत ठाणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार”: अश्विनी वैष्णव

Railway Minister Ashwini Vaishnaw:भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण १३२ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील रेल्वेच्या दर्जेदार पायाभूत सुविधेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री वैष्णव यांचे आभार मानले. या योजनेत ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा, शहाड, दिवा आणि बेलापूर या महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. यामुळे या भागातील प्रवाशांना आधुनिक सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

या योजनेमुळे स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच, स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील पुनर्विकासासाठी निवडलेल्या स्थानकांची नावे आणि त्यासाठीचा निधी पुढीलप्रमाणे 

- टिटवाळा स्टेशन: २५ कोटी रुपये
- शहाड स्टेशन: ८.४ कोटी रुपये
- दिवा स्टेशन: ४५ कोटी रुपये
- बेलापूर स्टेशन: ३२ कोटी रुपये

दरम्यान, याव्यतिरिक्त, कल्याण डोंबिवली परिसरातील डोंबिवली स्टेशनचा देखील या योजनेत समावेश आहे. या योजनेमुळे ठाणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना निश्चितच चांगला अनुभव मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तसेच मुंबईसाठी २३८ नव्या एसी लोकलचे काम सुरू करण्यात आल्याचेही केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. कल्याण ते बदलापूर तिसरी आणि चौथी मार्गिका, कल्याण-आसनगाव दरम्यान चौथ्या मार्गिकेचे कामही लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title: railway minister ashwini vaishnaw said amrit bharat station scheme will transform railway stations in thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.