रायगड, पालघरला आज मुसळधारेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 05:44 AM2019-09-16T05:44:30+5:302019-09-16T05:44:36+5:30

रविवारी पालघर जिल्ह्यासह लगतच्या परिसराला झोडपून काढलेल्या पावसाचा जोर सोमवारीही कायम राहणार आहे.

Raigad, Palghar alert for today | रायगड, पालघरला आज मुसळधारेचा इशारा

रायगड, पालघरला आज मुसळधारेचा इशारा

Next

मुंबई : रविवारी पालघर जिल्ह्यासह लगतच्या परिसराला झोडपून काढलेल्या पावसाचा जोर सोमवारीही कायम राहणार आहे. सोमवारी पालघर आणि रायगड या दोन जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाच्या मुसळधार सरी कोसळतील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. या व्यतिरिक्त मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १९ सप्टेंबरपर्यंत मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, जालना, हिंगोली या जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. १९ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या मुसळधार सरी कोसळतील. पुणे, सातारा, नाशिक, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल, असा
इशाराही हवामान खात्याने दिला आहे.
>पावसाचा अंदाज
१६-१७ सप्टेंबर : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
१८ सप्टेंबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
१९ सप्टेंबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.

>मुंबईच्या उपनगरात अजूनही जोर कायम
मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात पावसाचा जोर कायम आहे. रविवारी सकाळी शहराच्या तुलनेत पूर्व उपनगरात जोरदार सरी कोसळल्याची नोंद झाली आहे. रविवारी सांताक्रुझ वेधशाळेत ३१.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, सोमवारसह मंगळवारी मुंबईवरील आकाश अंशत: ढगाळ राहील. पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. रविवारी दुपारनंतर सरींनी विश्रांती घेतल्याने उपनगरवासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात २, पूर्व उपनगरात १, पश्चिम उपनगरात २ अशा एकूण ५ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. शहरात ७, पूर्व उपनगरात १ अशा एकूण ८ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. पूर्व उपनगरात १, पश्चिम उपनगरात १ अशा दोन ठिकाणी २ झाडे कोसळली.

Web Title: Raigad, Palghar alert for today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.