Join us  

“CM उद्धव ठाकरे जनतेला आपलेसे वाटणारे नेतृत्व, भविष्यात पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घ्यावी”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 12:04 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त अनेकविध स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहे.

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त अनेकविध स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरेंवर शिवसैनिकांसह नेते मंडळी, उद्योजक, दिग्गज मंडळी शुभेच्छांचा वर्षावर करत आहेत. अशातच आता शिवसेनेच्या एका खासदाराने विशेष शुभेच्छा देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भविष्यात पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घ्यावीत, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. (rahul shewale express wishes that uddhav thackeray to become prime minister) 

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी एका दैनिकामध्ये लिहिलेल्या एका लेखातून ही इच्छा व्यक्त केली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरेंनी सांभाळलेली शिवसेना, पेललेली आव्हाने याचा धांडोळा राहुल शेवाळे यांनी आपल्या लेखात घेतला आहे.

“जनता राग व्यक्त करू लागल्याने शिवसेना हादरलीय, लोकहिताशी संबंध नाही, हे सिद्ध झालंय”

दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा

दक्षिण आणि उत्तरेतील राज्यांतील जनतेला आपलेसे वाटू शकेल असे नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांचे असल्याने, ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे तमाम मराठी जनतेचे स्वप्न साकार करावे. त्यांनी भविष्यात पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घ्यावीत, अशी सदिच्छा राहुल शेवाळे यांनी व्यक्त केली.

नेमका कोणता क्षण टिपायचा याचा अचूक अंदाज

उत्तम छायाचित्रकार असल्याने नेमका कोणता क्षण टिपायचा आणि चांगले नेमबाज असल्याने नेमका निशाणा कुठे आणि कधी साधायचा? याचा अचूक अंदाज उद्धव ठाकरे यांना आहे. कोरोना संकटात महाराष्ट्राची उल्लेखनीय कामगिरी आणि त्याची विविध यंत्रणांनी घेतलेली दखल याविषयी राहुल शेवाळे यांनी आपल्या लेखात उल्लेख केला आहे. 

आता पेट्रोल आणि डिझेल एकाच दराने मिळणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येकाला आपला कुटुंब प्रमुख वाटतात. हे त्यांच्या नेतृत्वाचे यश आहे. घरातला माणूस नेतृत्व करतो, असे प्रत्येकाला वाटते. हे नेतृत्व प्रदीर्घ काळ टिकेल. राष्ट्रालाही त्यांच्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्वावादी नेतृत्वाची गरज आहे. ते देशाला नेतृत्व देतील, अशा शुभेच्छा मी त्यांना देतो, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :उद्धव ठाकरेराहुल शेवाळेशिवसेनाराजकारणपंतप्रधान