तंबाखू व्यसन सोडल्याने कॅन्सरच्या धोक्यात घट; टाटा मेमोरियल सेंटरच्या अभ्यासातून निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 09:55 IST2026-02-21T09:55:26+5:302026-02-21T09:55:55+5:30

हा अहवाल ‘इंटरनॅशन जरनल ऑफ कॅन्सर इंटरनॅशनल जरनल ऑफ कॅन्सर’ या जर्मलमध्ये प्रसिद्ध झाला.

Quitting tobacco reduces cancer risk Tata Memorial Center study concludes | तंबाखू व्यसन सोडल्याने कॅन्सरच्या धोक्यात घट; टाटा मेमोरियल सेंटरच्या अभ्यासातून निष्कर्ष

तंबाखू व्यसन सोडल्याने कॅन्सरच्या धोक्यात घट; टाटा मेमोरियल सेंटरच्या अभ्यासातून निष्कर्ष

मुंबई : तंबाखूचे सेवन पूर्णपणे थांबविल्यास तोंडाच्या कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो, असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत कार्यरत कर्करोग महामारीशास्त्र केंद्र येथील अभ्यासातून काढण्यात आला. हा अहवाल ‘इंटरनॅशन जरनल ऑफ कॅन्सर इंटरनॅशनल जरनल ऑफ कॅन्सर’ या जर्मलमध्ये प्रसिद्ध झाला.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

अभ्यासानुसार, धूम्रपान आणि तंबाखूचे व्यसन सोडल्यानंतर दहा वर्षांनी तोंडाच्या कर्करोगाचा धोका  कमी होतो. सध्याच्या तंबाखू सेवन करणाऱ्यांच्या तुलनेत धूम्रपान सोडणाऱ्यांमध्ये कर्करोगाचा धोका ६१ टक्क्यांनी घटतो, तर तंबाखू सोडणाऱ्यांमध्ये हा धोका ४२ टक्क्यांनी कमी झाल्याचे स्पष्ट झाले. परंतु, हे व्यसन सोडल्याने धोका कमी होत असला तरी तो तंबाखूचे व्यसन नसलेल्या व्यक्ती एवढे धोक्याचे प्रमाण कमी नसते, असे स्पष्ट केले. त्यामुळे हे व्यसन कधीही सुरू न करणे हाच सर्वांत प्रभावी प्रतिबंधात्मक पाऊल असल्याचे या अभ्यासातून अधोरेखित झाले आहे.

प्रभावी उपाययोजनांची आवश्यकता

भारतातील सुमारे ३० टक्के लोकांना तंबाखूचे व्यसन आहे. त्यामुळे याविरोधी प्रतिबंधात्मक धोरणांसोबतच हे व्यसन सोडण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची आवश्यकता.

 टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक सुदीप गुप्ता यांनी सांगितले की, या अभ्यासातील निष्कर्षांचा उपयोग शासनाच्या तंबाखूविरोधी कार्यक्रमांमध्ये करता येईल. प्रभावी तंबाखू नियंत्रण धोरणांमुळे ८० टक्क्यांहून अधिक तोंडाचे कर्करोग टाळता येऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले.

पहिले ठोस वैज्ञानिक पुरावे

डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी सांगितले, तंबाखूचा कोणताही प्रकार तोंडाच्या कर्करोगासाठी गंभीर जोखमीचा घटक आहे. हे व्यसन सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तर कर्करोग महामारीशास्त्र केंद्राचे संचालक अणि या अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ. राजेश यांनी सांगितले, तंबाखू चघळण्याची सवय सोडल्याने दीर्घकालीन कर्करोगाचा धोका कमी होतो, याचे हे पहिले ठोस वैज्ञानिक पुरावे आहेत. त्यामुळे सध्याच्या तंबाखू वापरकर्त्यांनी त्वरित सवय सोडणे गरजेचे असल्याचे त्यांनी आवाहन केले.

Web Title : तंबाकू छोड़ने से कैंसर का खतरा कम: टाटा मेमोरियल सेंटर का अध्ययन

Web Summary : टाटा मेमोरियल सेंटर के अध्ययन से पता चला है कि तंबाकू छोड़ने से मुंह के कैंसर का खतरा काफी कम हो जाता है। छोड़ने के दस साल बाद, धूम्रपान करने वालों के लिए जोखिम 61% और तंबाकू चबाने वालों के लिए 42% कम हो जाता है। जल्दी छोड़ना महत्वपूर्ण है, क्योंकि जोखिम गैर-उपयोगकर्ताओं की तुलना में अधिक रहता है। प्रभावी तंबाकू विरोधी उपाय महत्वपूर्ण हैं।

Web Title : Quitting Tobacco Reduces Cancer Risk: Tata Memorial Centre Study Finds

Web Summary : Tata Memorial Centre study reveals quitting tobacco significantly lowers oral cancer risk. Ten years after quitting, the risk decreases by 61% for smokers and 42% for tobacco chewers. Early cessation is crucial, as risk remains higher than in non-users. Effective anti-tobacco measures are vital.