Join us

जलद लोकलला धिम्या मार्गावरील स्थानकांवर थांबा; अनंत चतुर्दशीला प्रवाशांची सोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 06:32 IST

गर्दीच्या वेळी जलद मार्गावरील लोकल मुंबई सेंट्रल ते चर्चगेट स्थानकांदरम्यान थांबविण्यात येत नाही

मुंबई : गणेश विसर्जनादिवशी मुंबई सेंट्रल ते चर्चगेट स्थानकांदरम्यान जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावरील स्थानकांवर थांबविण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

त्यामुळे १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ८.३० वाजेपर्यंत ग्रॅण्ट रोड, चर्नी रोड, मरिन लाइन्स, चर्चगेट या स्थानकांवर सर्व लोकल थांबतील. गर्दीच्या वेळी जलद मार्गावरील लोकल मुंबई सेंट्रल ते चर्चगेट स्थानकांदरम्यान थांबविण्यात येत नाही. त्यामुळे पश्चिम रेल्वेने लोकल तीन धिम्या स्थानकांवर थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :रेल्वे