कोयना धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागणार

By Admin | Updated: July 13, 2014 23:13 IST2014-07-13T23:13:24+5:302014-07-13T23:13:24+5:30

कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांच्या समस्या गेल्या ५० वर्षांपासून प्रलंबित आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या वसाहती आहेत.

Questions of Koyna damages will be addressed | कोयना धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागणार

कोयना धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागणार

पनवेल : कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांच्या समस्या गेल्या ५० वर्षांपासून प्रलंबित आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या वसाहती आहेत. या वसाहतीचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी आमदार विवेक पाटील यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मंत्रालयात बैठक संपन्न झाली.
कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याची मागणी आमदार विवेक पाटील यांनी शासनाकडे केली होती. याबाबत बैठकीचे आयोजन करण्याची विनंती त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जूनमध्ये केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक बोलावून प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा केली. दोन महिन्यात कोयना धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यात येतील, असे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिले. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार कोयना प्रकल्पग्रस्तांना नागरी सुविधांसाठी १२ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या वसाहती महसुली गावे म्हणून जाहिर करून शासनाकडून स्वतंत्र ग्रामपंचायती मिळणार आहेत.

Web Title: Questions of Koyna damages will be addressed