Disha Salian Case:'दिशा सालियन प्रकरणी सुनावणीपूर्वीच न्यायमूर्तींच्या भूमिकेवर प्रश्न'; वकिलांनी मोठा आरोप केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 19:02 IST2025-04-01T18:58:52+5:302025-04-01T19:02:52+5:30

Disha Salian Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हावी अशा मागणीची याचिका सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

Question on the role of the judge even before the hearing in the Disha Salian case Lawyers make a big allegation | Disha Salian Case:'दिशा सालियन प्रकरणी सुनावणीपूर्वीच न्यायमूर्तींच्या भूमिकेवर प्रश्न'; वकिलांनी मोठा आरोप केला

Disha Salian Case:'दिशा सालियन प्रकरणी सुनावणीपूर्वीच न्यायमूर्तींच्या भूमिकेवर प्रश्न'; वकिलांनी मोठा आरोप केला

Disha Salian Case ( Marathi News ) : दिशा सालियान ( Disha Salian ) मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार आहे. दिशाचे वडिल सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आता या याचिकेवरुन दिशा सालियनच्या वडिलांचे वकील निलेश ओझा यांनी नवा आरोप केला आहे. ओझा यांनी न्यायमूर्ती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांचे कनेक्शन सांगितले आहे. 

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी उद्या बुधवारी सुरू होणार आहे. याआधीच वकील निलेश ओझा यांनी मोठा दावा केला आहे. ओझा यांनी थेट न्यायाधीशांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

Disha Salian Case: 'आदित्य ठाकरे अन् रिया चक्रवर्तीचे अनेक वर्षापासूनचे संबंध'; वकिलांचा मोठा दावा

वकिलांनी आरोप काय केले?

वकील ओझा म्हणाले, आमच्याकडून सुनावणीची पूर्ण तयारी झाली आहे, मात्र उद्या सुनावणीत काही  होण्याची शक्यता कमी आहे. कारण, ज्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे, त्यांच्याविरोधातच आमची तक्रार आहे.न्यायमूर्तींची सख्खी बहीण वंदना चव्हाण सक्रिय राजकारणी असून त्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षात आहेत. त्यामुळे, विविध कारणांमुळे उद्या हे प्रकरण न्यायालयाकडूनच दुसऱ्या खंडपीठासमोर घेऊन जा, असं सांगितलं जाण्याची शक्यता असल्याचा आरोपही निलेश ओझा यांनी केला. 

"दिशा सालियन प्रकरणात दिशाचे वडील सतीश सालियन यांनी १ लाख कोटींच्या मानहानीचा दावा तयार केला आहे. या दाव्यातून मिळणार ९० टक्के रक्कम मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस अनुदान देणार असल्याची घोषणा वकील निलेश ओझा यांनी केली. यातील उर्वरीत १ लाख कोटी रुपयांमधील ९ टक्के रक्कम इनामदार पत्रकारांसाठी तर यातील १ टक्के रक्कम फक्त स्वत:कडे सतीश सालियन ठेवणार असल्याची माहिती निलेश ओझा यांनी दिली.
 

Web Title: Question on the role of the judge even before the hearing in the Disha Salian case Lawyers make a big allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.