Join us

क्यूआर कोड पास आठवड्यात; स्कॅन केल्यावर स्थानकात प्रवेश, अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेसेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 06:23 IST

गर्दीचे नियोजन करणे, लोकल-रेल्वे स्थानकांमध्ये फिजिकल डिस्टसिंगच्या नियमाचे पालन करण्यासाठी पश्चिम रेल्वेने आता क्यूआर कोडच्या पासची सक्ती केली आहे.

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर १५ जूनपासून निवडक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू झाली आहे. लोकल सुरू करण्याअगोदरच रेल्वेने राज्य सरकारला कर्मचाºयांना क्यूआर कोड असलेले कार्ड देण्याची अट घातली होती. मात्र, एक महिना झाला तरी कर्मचाºयांना पास देण्यात आले नाहीत. राज्य सरकार आणि मध्य, पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांद्वारे क्यूआर कोड पासचे काम वेगात सुरू आहे. पुढील आठवड्यात पासची सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.गर्दीचे नियोजन करणे, लोकल-रेल्वे स्थानकांमध्ये फिजिकल डिस्टसिंगच्या नियमाचे पालन करण्यासाठी पश्चिम रेल्वेने आता क्यूआर कोडच्या पासची सक्ती केली आहे. ज्या कर्मचाºयांकडे असा पास नसेल त्यांना रेल्वे स्थानक आणि लोकलमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. त्यांच्याकडून दंडही आकारण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने आपल्या रेल्वे स्थानकात तशा उद्घोषणा करण्यास सुरुवात केली असून २० जुलैपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांना लोकल प्रवासासाठी क्यूआर कोडच्या पासची सक्ती करण्याची शक्यता आहे, तर मध्य रेल्वे प्रशासन लवकरात लवकर हा पास अमलात आणणार आहे.क्यूआर कोड असलेले पास देण्याचे काम राज्य सरकार, महापालिका आणि पोलीस विभागाकडून सुरू आहे. सर्व कर्मचाºयांचा तपशील, माहिती एकत्र केली जात आहे. या आठवड्यात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे कर्मचाºयांच्या कामाच्या वेळा कळणार असून त्यानुसार लोकलमधील गर्दीचे नियोजन करण्यासाठी मदत होणार आहे. हे पास कर्मचाºयांच्या कार्यालयीन ओळखपत्राशी संलग्न केले जाणार आहेत. कर्मचाºयांना रेल्वे स्थानकात प्रवेश करताना तैनात असलेल्या टीसी, जीआरपी, आरपीएफ जवानांना आपला क्यूआर कोड दाखवायचा आहे. रेल्वे कर्मचारी मोबाइलद्वारे पास स्कॅन करेल.संस्थेला पोलीस मुख्यालयाकडून पास मिळणारनिवडक अत्यावश्यक सेवेतील कोणताही कर्मचारी पोलिसांकडे क्यूआर कोड पास घेण्यासाठी जाऊ शकत नाही. जे कर्मचारी ज्या संस्थेत काम करत आहेत तेथून क्यूआर कोड पास मिळेल. संबंधित संस्थेने क्यूआर कोड पास पोलीस मुख्यालयातून घ्यावे. रेल्वेकडून पास मिळणार नाही. राज्य सरकार क्यूआर कोडवर काम करीत आहे. मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी राज्य सरकारसोबत संपर्कात आहेत. लवकरात लवकर ते पास वितरित करण्यात येणार आहेत.- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वेक्यूआर कोड पासची प्रक्रिया सुरू असून २० जुलैपर्यंत तो तयार करण्याचे अंतिम लक्ष्य ठरविण्यात आले आहे..- सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

टॅग्स :मुंबई लोकलमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस