Join us
Daily Top 2Weekly Top 5

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात ‘सार्वजनिक बांधकाम’ अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 06:43 IST

मनीषा पाटणकर-म्हैसकर यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

मुंबई : राज्य सरकारच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा आणि सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत मंत्रालयीन विभागात १८६.७५ गुणांसह सार्वजनिक बांधकाम विभाग सर्वोत्तम ठरला. शनिवारी सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

शासकीय कामकाज पारदर्शक, गतिमान व नागरिकाभिमुख करण्याच्या हेतूने ई-गव्हर्नन्स सुधारणा व सेवाकर्मी कार्यक्रम राबविण्यात आला होता. या अंतर्गत अधिकृत वेबसाइट, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफिस, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सॲप चॅटबॉट,  ‘एआय’ व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर, जीआयएस तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर असे ७ महत्त्वाचे निकष ठरविण्यात आले होते.

पुरस्कारविजेते सर्वोत्तम विभागसार्वजनिक बांधकाम विभाग :मनीषा पाटणकर म्हैसकर (अपर मुख्य सचिव)

वनविभाग : मिलिंद म्हैसकर (अपर मुख्य सचिव)

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग :पराग जैन-नैनुटिया (प्रधान सचिव)

परिवहन व बंदरे विभाग : संजय सेठी (अपर मुख्य सचिव)

पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग :जयश्री भोज (सचिव)

शालेय शिक्षण विभाग : रणजितसिंह देओल (प्रधान सचिव)

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग : धीरज कुमार (सचिव) 

English
हिंदी सारांश
Web Title : Public Works Department Tops E-Governance Improvement Program: Key Highlights

Web Summary : Maharashtra's Public Works Department excelled in e-governance reforms, scoring highest among ministerial departments. The initiative aimed to make government work transparent and efficient using technology. Awards were presented by Chief Minister Fadnavis to recognize top performers in various departments.
टॅग्स :देवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र सरकार