गप्पांत रंगले असतानाच मृत्यूने गाठले; PWD विभागाच्या सचिवांचे आकस्मिक निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 09:24 IST2023-02-24T09:24:15+5:302023-02-24T09:24:30+5:30

मे महिन्यात सेवानिवृत्त होणारे नवघरे काळाघोडा परिसरातील तृष्णा या हॉटेलमध्ये बुधवारी सायंकाळी मित्रांसोबत जेवायला गेले होते.

Public Works Department Secretary Prashant Navghare passed away | गप्पांत रंगले असतानाच मृत्यूने गाठले; PWD विभागाच्या सचिवांचे आकस्मिक निधन

गप्पांत रंगले असतानाच मृत्यूने गाठले; PWD विभागाच्या सचिवांचे आकस्मिक निधन

मुंबई : हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर मित्रांसोबत गप्पागोष्टी सुरू असतानाच सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव प्रशांत नवघरे (आयएएस) यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना मित्रांनी रुग्णालयात नेले. मात्र, तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.  

मे महिन्यात सेवानिवृत्त होणारे नवघरे काळाघोडा परिसरातील तृष्णा या हॉटेलमध्ये बुधवारी सायंकाळी मित्रांसोबत जेवायला गेले होते. तिथे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काही कळायच्या आत ते खाली कोसळले. मित्रांनी तातडीने नवघरे यांना जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र त्याआधीच नवघरे यांना मृत्यूने गाठले. या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग (एमआरए) पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. प्राथमिक तपासात हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. मात्र शवविच्छेदनाच्या अंतिम अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. या घटनेने त्यांच्या मित्रांसह कुटुंबीयांना धक्का बसला आहे.  

Web Title: Public Works Department Secretary Prashant Navghare passed away