Join us  

क्रूरतेची सीमा... तुकड्या तुकड्यात विखुरलेली मनोविकृती!

By पूनम अपराज | Published: January 21, 2020 7:24 PM

कू्ररतेची सीमा ओलांडणाऱ्या हत्या । बहुतेकांचा असतो पहिलाच गुन्हा

ठळक मुद्दे जो पहिल्यांदा गुन्हा करतो तो व्यक्ती पुरावे नष्ट करण्याचे आटोकाट प्रयत्न करते़ कारण त्यांना समाजात राहायचे असते़गेल्या महिन्यात २ डिसेंबरला माहीम येथील दर्ग्यामागे समुद्रकिनारी सापडलेल्या सुटकेसमध्ये मानवी शरीराचे अर्धवट २ डिसेंबरला आढळून आले होते.

पूनम अपराज 

मुंबई : एखाद्या व्यक्तीची रागाच्या भरात हत्या केली जाते तर एखाद्याची ठरवून कट रचून थंड डोक्याने हत्या होते. मात्र, सध्या थंड डोक्याने (कोल्ड ब्लडेड) होणाऱ्या हत्या या क्रूरतेच्या सीमा ओलांडणाºया आहेत. कारण यामध्ये आरोपी केवळ हत्या करत नाही तर मृतदेहाचे विकृत पद्धतीने तुकडे तुकडे करतो. हे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढू लागले आहे. नीरज ग्रोव्हर प्रकरण असो वा निठारी हत्याकांड किंवा अलीकडेच वाकोला येथील ज्येष्ठ नागरिकांची अल्पवयीन मुलीने आणि मुलाने केलेल्या हत्येच प्रकरण असो. साम्य एकच, मृतदेहाचे अनेक तुकडे करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. गुन्हेगारांची इतकी क्रूर मानसिकता का बनत चालली आहे? त्याबद्दल मानसोपचार तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. याबाबत घेतलेला या सखोल आढावा़

पोलीस दलात खळबळ माजविणाºया सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे प्रकारांत देखील हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून खाडीत फेकून देण्यात आले होते. अश्विनी बिद्रेंचा प्रियकर असलेल्या निलंबित पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याने मित्रांच्या मदतीने हत्या केल्याचे उघड झाले. अश्विनी बिद्रे यांच्या शरीराचे कटरच्या मदतीने बारीक बारीक तुकडे करून काही दिवस घरातील फ्रीजमध्ये ठेवल्याचे समोर आले़ खाडीतील लोखंडी पेटी आणि शरीराचे तुकडे शोधण्यासाठी अग्निशमन दल, तसेच नौदलाची मदत घेतली होती. ठाण्यात आपल्याच चुलत्याने ३ वर्षांपूर्वी जादूटोणा केल्यानेच वडिलांचा मृत्यू झाल्याच्या संशयातून मित्रांच्या मदतीने विष्णू किसन नागरे या चुलत्याची निर्घृण हत्या केली होती़हत्यांचा सिलसिलागेल्या महिन्यात २ डिसेंबरला माहीम येथील दर्ग्यामागे समुद्रकिनारी सापडलेल्या सुटकेसमध्ये मानवी शरीराचे अर्धवट २ डिसेंबरला आढळून आले होते. बेनेट यांची स्वत:ला मानसकन्या म्हणून घेणाºया आराध्याने बेनेट यांची लैंगिक अत्याचारास बळजबरी करत असल्याने प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचे सांगितले.

याच महिन्यातच सोलापूर येथील आसरा चौकाशेजारी असलेल्या पुलाजवळील रेल्वे रूळाशेजारी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला़ शरीराचे बारीक बारीक तुकडे करून पोत्यात भरून टाकल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आले होते. महेंद्र माधवदास बुवा असे त्या नाव असल्याचे निष्पन्न झाले. बीडमध्ये पतीनेच रेश्मा संजय साळवे हिची हत्या करून प्रेताचे तुकडे करून ९ दिवस ते फ्रिजमध्ये ठेवल्याचे उघडकीस आले होते़ रागाच्या भरात मुलाने आईची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावली़ नंतर त्याने थर्टी फर्स्टही साजरे केले.

अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांना मनोविकृत म्हणजेच पर्सनॅलिटी डिसआॅर्डर म्हणावे लागेल. असे क्रू र गुन्हे करणारे गुन्हेगारांची सदसद्विवेक बुद्धी कमी काम करत असते. अशा मनोविकृत लोकांना भावना खूप कमी असते़ ते भावनात्मक नसतात. मनोविकृत (पर्सनॅलिटी डिसआॅर्डर) आणि मनोविकार (मेंटल डिसआॅर्डर) हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत. हत्या करून शरीराचे तुकडे तुकडे करणे हा गुन्हा करणारा मनोविकार असणारा नाही तर तो मनोविकृत असतो. मनोविकृती असलेल्या व्यक्तीला समुपदेशन करणं हा एक इलाज आहे. पण त्याने तो पूर्ण बरा होईलच याची खात्री देऊ शकत नाही. कारण ती विकृती आहे.- डॉ. निशिकांत विभुते, मानसोपचार तज्ज्ञपुरावे पोलिसांपासून लपून राहत नाहीमाहीम दर्गा येथील समुद्र किनाºयाच्या अलीकडेच एका सुटकेसमध्ये मृतदेहाचे तुकडे सापडले होते. या प्रकरणाचा यशस्वी तपास करणारे पोलीस अधिकारी जगदीश साईल यांनी सांगितले की, ही गुन्हेगारांची मानसिकता आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यात बहुतांश पहिल्यांदा गुन्हा करणारे आरोपी आहेत. सराईत गुन्हेगार हे अचानकपणे पुढे होणाºया परिणामांची पर्वा न करता गुन्हे करतो. प्रत्येक गुन्हेगार हा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, पुरावे पोलिसांपासून लपून राहत नाही. हा माहीममध्ये जो गुन्हा घडला. अशा प्रकारचे गुन्हे घरगुती भांडण किंवा अनावधानाने घडतो. मात्र, तो गुन्हाच त्यात माफी नाही. परंतु, जो पहिल्यांदा गुन्हा करतो तो व्यक्ती पुरावे नष्ट करण्याचे आटोकाट प्रयत्न करते़ कारण त्यांना समाजात राहायचे असते.

आपण केलेला गुन्हा कोणाला कळू नये म्हणून मृतदेह तुकड्यांत विभागून वेगवगेळ्या ठिकाणी फेकून दिला जातो. मात्र, पोलीस अशाही गुन्ह्यांत आरोपींचा माग काढण्यात मागे नाही. वडिलांनी मुलीची, मुलाने आईची आणि अल्पवयीन मुलांनी देखील असे गुन्हे केलेले आहेत.

आजकाल पालक सतत मोबाइलच्या दुनियेत गर्क असतात. त्यांचे मुलांकडे दुर्लक्ष होते. सतत एखादी गोष्ट पाहणे, तिचा विचार करणे त्यामुळे अशी विकृती उदयास येते. प्रेझेंट (आता), प्रॉमिनंट (प्रामुख्याने) आणि पर्सिस्टंट (सतत) या तीन गोष्ट एखादी गोष्ट करण्यास भाग पडते. अशा प्रकारची विकृती ही त्या व्यक्तीचा झालेला छळ आणि छळातून निर्माण होणारी घृणा आणि क्रोध यातून निर्माण होते. त्यामुळे मुलांना चांगलं आणि वाईट गोष्ट असं ‘गुड टच आणि बॅड टच’बद्दल शिकवलं जातं, तसं समजावून सांगितले पाहिजे. लहानपणापासून मुलांच्या मनावर चांगले संस्कार घडविणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या विकृतीला आळा घालू शकतो. मेडिटेशन हे अशा विकृतीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करू शकेल. - डॉ. कमलेश सूर्यवंशी, होमिओपॅथी तज्ज्ञ

टॅग्स :गुन्हेगारीखूनपोलिसमुंबई