बांधकाम क्षेत्रातील नाका कामगारांसाठी ४.८५ कोटींची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 10:13 AM2023-12-01T10:13:55+5:302023-12-01T10:14:59+5:30

७ हजार ५०० जणांना मिळणार लाभ.

provision of 4.85 crores for Naka workers in construction sector in mumbai | बांधकाम क्षेत्रातील नाका कामगारांसाठी ४.८५ कोटींची तरतूद

बांधकाम क्षेत्रातील नाका कामगारांसाठी ४.८५ कोटींची तरतूद

मुंबई : बांधकामाच्या क्षेत्रातील बांधकामाची आधुनिक पद्धती लक्षात घेवून मुंबई शहर आणि उपनगर  येथील ७ हजार ५०० नाका कामगारांना पूर्वज्ञान कौशल्य विकसित  करण्यासाठी पहिल्या टप्प्यात चार कोटी ८५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक कामगाराचा कौशल्य विमा सुद्धा विभागामार्फत काढण्यात येणार  येणार आहे, अशी माहिती  कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा 
यांनी दिली. 

भारतीय मजदूर संघ आणि बांधकाम सेक्टर स्किल  काउंसिल यांच्या संयुक्त विद्यमाने कामगारांना पूर्वज्ञान कौशल्य  प्रमाणिकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,  या कार्यक्रमात मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी  अनिल सोनवणे, अनिल घुमने, नाका कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

‘कौशल्य विकसित करा’ :

राज्यामध्ये बांधकाम क्षेत्रात कुशल कामगारांची आवश्यकता व त्यामधील ५५ टक्के त्रुट लक्षात घेता बांधकाम क्षेत्रामधील ४७ टक्के  कुशल कामगारांचा आजही अभाव समोर येतो. महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य असून, बांधकाम क्षेत्रात होणारे बदल लक्षात घेवून नाका कामगारांना कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे, असे यावेळी लोढा म्हणाले.

 कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागा अंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य युवा विकास योजना कार्यक्रमाच्यावेळी नाका कामगारांना बांधकाम क्षेत्रात देण्यात येणाऱ्या  प्रशिक्षण विषयक  साहित्याचे वाटप करण्यात आले.

Web Title: provision of 4.85 crores for Naka workers in construction sector in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई