१२५ परीक्षा केंद्रांना अखंड वीज द्या!

By admin | Published: February 17, 2015 02:22 AM2015-02-17T02:22:07+5:302015-02-17T02:22:07+5:30

परीक्षेसाठी जनरेटर दिले जाणार की नाही याची हमी राज्य शासनाने प्रतिज्ञापत्रावर उद्या, मंगळवार, १७ फेब्रुवारी रोजी सादर करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी दिले.

Provide power to 125 examination centers! | १२५ परीक्षा केंद्रांना अखंड वीज द्या!

१२५ परीक्षा केंद्रांना अखंड वीज द्या!

Next

मुंबई : येत्या शनिवारी बारावीची परीक्षा सुरू होत असली तरी सध्या राज्यातील १२५ परीक्षा केंद्रे अंधारातच असून, त्यांना परीक्षेसाठी जनरेटर दिले जाणार की नाही याची हमी राज्य शासनाने प्रतिज्ञापत्रावर उद्या, मंगळवार, १७ फेब्रुवारी रोजी सादर करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी दिले.
हे आदेश देताना न्यायालयाने शासनाचे चांगलेच कान उपटले. न्यायालय म्हणाले, की परीक्षा केंद्रांना अखंड वीजपुरवठा करा, असे आदेश गेल्यावर्षी आॅक्टोबरमध्ये देण्यात आले होते. असे असतानाही शेकडो
केंद्रे अंधारातच आहेत. तसेच वीजपुरवठा करण्याची जबाबदारी परीक्षा मंडळाची असल्याचा दावा शासन करीत आहे.
त्यातही परीक्षा केंद्रांवर लोडशेडिंग आहे की नाही, याचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांनी द्यावे, असे फर्मान शासनाने जारी केले आहे. शासनाची ही कृती म्हणजे धक्कादायक आहे. परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी लोडशेडिंगचे प्रमाणपत्र द्यावे, हे हास्यास्पद आहे. मुळात ही कल्पना कोणत्या अधिकाऱ्याच्या सुपीक डोक्यातून आली, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. तेव्हा त्या अधिकाऱ्याचे नाव न्यायालयात सादर करा. त्या अधिकाऱ्याविरोधात न्यायालयाच्या अवमानतेची कारवाई केली जाईल. तसेच गेल्यावर्षी आदेश देऊनही लोडशेडिंग असलेल्या परीक्षा
केंद्रांना जनरेटर का दिले गेले नाहीत, याचाही खुलासा शासनाने करावा, असेही न्यायालयाने या वेळी नमूद केले. (प्रतिनिधी)

परीक्षा केंद्रांवर लोडशेडिंग नको

Web Title: Provide power to 125 examination centers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.