Join us
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 13:57 IST

Raj Thackeray News: या मोर्चातील आंदोलकांनी राज ठाकरे यांच्याशी समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली.

Raj Thackeray News: खेड तालुक्याच्या लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी मुंबईत येऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत लक्ष्मी ऑरगॅनिकला का विरोध होत आहे, याची सविस्तर माहिती देण्यात आली. यानंतर राज ठाकरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. 

खेड तालुक्याच्या लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधात येत्या सहा एप्रिलला कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचकोशी पर्यावरण संरक्षण संघर्ष समिती आणि पंचक्रोशीतील ग्रामपंचायतींच्या वतीने लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चाला रत्नागिरी सह इतर जिल्ह्यातूनही पाठिंबा मिळत असल्याचे चित्र समोर आले आहे. 

समस्यांबाबत राज ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा

या मोर्चातील आंदोलकांनी राज ठाकरे यांच्याशी समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी आंदोलकांनी एक निवेदन राज ठाकरे यांना दिले. तसेच या आंदोलनाला पाठिंबा देण्याची विनंती केली. राज ठाकरे यांनी आंदोलनाचे म्हणणे ऐकून घेतले आणि आंदोलनाला पाठिंबा दिला. याबाबत कोकण नागरी संघर्ष समिती अध्यक्ष उदय घाग यांनी माहिती दिली. 

दरम्यान, कोकणात येणारा लक्ष्मी ऑरगॅनिक्स या इटली मधील घातक प्रकल्पाला काँग्रेस पक्षाचा विरोध असून या प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे. इटलीमध्ये बंद पडलेल्या या केमिकल कंपनीचे तंत्रज्ञान वापरल्यामुळे कोकणातील पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार आहे. काँग्रेस पक्ष हा प्रश्न विधिमंडळातही उपस्थित करणार आहे व कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस पक्ष हा प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Raj Thackeray Backs Protest Against Lakshmi Organic Plant in Kokan

Web Summary : Raj Thackeray supports the agitation against Lakshmi Organic in Kokan's Lote Parshuram industrial area. Protestors met Thackeray, detailing their concerns about environmental damage. A massive protest is planned, backed by various organizations and political parties, including Congress, who oppose the project's potential harm.
टॅग्स :राज ठाकरेमनसेचिपळुण