मुंबई : ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालकांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’ने ३ कोटी ३६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये नवी मुंबई-खारघरमधील कार्यालयांचा समावेश आहे.
ज्ञानराधा सोसायटीने १२ ते १४ टक्के व्याजदराने परतावा देणाऱ्या अनेक ठेव योजना सादर केल्या होत्या. तसेच, सोसायटीने सोने, वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज, मुदत ठेवींवर कर्ज अशा कर्ज योजनादेखील सादर केल्या होत्या. सुरेश कुटे आणि यशवंत कुलकर्णी या दोघांच्या नियंत्रणाखाली सोसायटीचे काम चालत होते. त्यांनी राज्यभरातील किमान चार लाख गुंतवणूकदारांना गंडा घातल्याचे तपासादरम्यान निदर्शनास आले आहे. काही ठरावीक गुंतवणूकदारांना सुरुवातीला त्यांनी परतावा दिला होता. मात्र, त्यानंतर अनेक गुंतवणूकदारांना एक रुपयादेखील परत मिळालेला नाही.
ताब्यात घेतलेली मिळकत १,६२५ कोटी
या गैरव्यवहारप्रकरणी राज्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले होते. मात्र, मनी लाँड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ‘ईडी’नेही या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. दरम्यान, आतापर्यंत सोसायटीची एकूण १,६२५ कोटी ३६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
कुटे यांनी २,४६७ कोटी रुपयांचा अपहार करून ते पैसे अन्य कंपन्यांत कर्ज रूपाने वळवल्याचा ठपकादेखील ‘ईडी’ने ठेवला आहे. हे पैसे नंतर रोखीने काढून घेऊन त्यातून त्यांनी मालमत्तांची खरेदी केल्याचेही तपासात निष्पन्न झाले.
Web Summary : ED seized ₹3.36 crore of Gyanradha Society's assets in a fraud case. The society allegedly duped investors with high-return schemes. Directors Suresh Kute and Yashwant Kulkarni are accused of diverting funds, with total assets seized now reaching ₹1,625 crore.
Web Summary : ईडी ने ज्ञानराधा सोसायटी की धोखाधड़ी में 3.36 करोड़ रुपये की संपत्ति जब्त की। सोसायटी पर निवेशकों को उच्च रिटर्न योजनाओं से धोखा देने का आरोप है। निदेशक सुरेश कुटे और यशवंत कुलकर्णी पर धन के हेरफेर का आरोप है, अब तक जब्त की गई कुल संपत्ति ₹1,625 करोड़ तक पहुंच गई है।