आरटीओच्या तीन अधिकाऱ्यांना पदोन्नती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 21:32 IST2020-06-29T21:32:13+5:302020-06-29T21:32:22+5:30
अमरावती येथील सहाय्यक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांना वाशिम उपप्रादेशिक पदावर पदोन्नती दिली आहे.

आरटीओच्या तीन अधिकाऱ्यांना पदोन्नती
मुंबई : मोटार वाहन विभागातील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावरील तीन अधिकाऱ्यांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
अमरावती येथील सहाय्यक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांना वाशिम उपप्रादेशिक पदावर पदोन्नती दिली आहे. तर कोकण विभागातील सहाय्यक परिवहन अधिकारी महेंद्र पाटील यांची मुंबईत पश्चिम(अंधेरी) प्रादेशिक विभाग येथे आणि कोकण विभागाचे सहाय्यक परिवहन अनिल अहेर यांची मुंबईत पूर्व प्रादेशिक विभाग येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.