Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापक हत्या प्रकरण; 'गर्दीत इतर कुणाच्यातरी शस्त्रामुळे...', प्राध्यापक हत्या प्रकरणी आरोपीच्या वकिलाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 06:38 IST

Mumbai Crime News: लोकल ट्रेनमधून उतरण्याच्या वादातून प्राध्यापक आलोककुमार अनिल सिंग (३२) यांची हत्या करणाऱ्या ओमकार शिंदे (२७) याला अटक करण्यात आली. आलोक यांचे वडील संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत.

मुंबई - लोकल ट्रेनमधून उतरण्याच्या वादातून प्राध्यापक आलोककुमार अनिल सिंग (३२) यांची हत्या करणाऱ्या ओमकार शिंदे (२७) याला अटक करण्यात आली. आलोक यांचे वडील संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, या प्रकरणी अटक आरोपी ओमकार शिंदे याला कोर्टात हजर केले असता ‘आरोपीचा हत्या करण्याचा हेतू नव्हता. गर्दीत इतर कुणाच्यातरी शस्त्रामुळे प्राध्यापकाला जखम झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. फिर्यादीत चाकूने वार केल्याचा स्पष्ट उल्लेख नाही’, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला.

मालाड स्टेशनवर आरोपी शिंदे याने रागाच्या भरात खिशातील टोकदार चिमटा काढला आणि आलोक यांच्या पोटात खुपसला आणि तो पळून गेला. अतिरक्तस्त्रावामुळे आलोक यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटविली. आरोपी शिंदे हा दररोज मालाड ते चर्नी रोड असा लोकल प्रवास करतो. तो मालाड स्टेशनवर येताच पोलिसांनी मालाड स्थानकात सापळा लावून त्याला अटक केली.

३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीआरोपीला न्यायालयाने ३० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीची सखोल चौकशी करायची असल्याने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकिलांनी केली. ‘आरोपीचा हत्या करण्याचा हेतू नव्हता. गर्दीत इतर कुणाच्यातरी शस्त्रामुळे प्राध्यापकाला जखम झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. फिर्यादीत चाकूने वार केल्याचा स्पष्ट उल्लेख नाही’, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. उद्या लोकलमध्ये कोणी चिरडले गेले, तर हत्येचा गुन्हा दाखल करणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आरोपी शिंदेकडे हत्यार कुठून आले?आरोपी ग्रँट रोड परिसरात इमिटेशन ज्वेलरीत काम करतो. त्यामुळे त्याच्या बॅगेत चिमटा होता. त्याच चिमट्याने त्याने आलोक सिंग यांच्यावर वार केला. चार ते पाच इंच खोलवर जखम होऊन रक्तस्त्रावाने त्यांचा मृत्यू झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Professor's Murder: Accused's lawyer claims weapon may have belonged to someone else.

Web Summary : Omkar Shinde was arrested for killing Professor Alok Kumar Singh in a train dispute. Shinde's lawyer argued that the fatal wound might have been caused by another person's weapon, not necessarily with intent to kill. Shinde is in police custody until January 30th.
टॅग्स :गुन्हेगारीमुंबईमुंबई उपनगरी रेल्वे