Join us

निर्माता शेखर ताम्हाणे यांचे कोरोनामुळे निधन; काही दिवसांपूर्वी पत्नीचाही कोरोनामुळे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 06:49 IST

ताम्हाणे दाम्पत्याची मुलगी आरती यांनी आईचे निधन झाल्यानंतर कोरोनाची लागण झाल्यानंतर जनजागृती करणारी फेसबुक पोस्टही शेअर केली होती.

मुंबई - ज्येष्ठ निर्माता, नाटककार आणि कलाकार संघाचे आधारस्तंभ असलेले शेखर ताम्हाणे यांनी बुधवारी रात्री ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. कोरोनामुळे ताम्हाणे यांचे निधन झाले असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. १९ एप्रिल रोजी ताम्हाणे यांच्या पत्नी उमा यांचेही कोरोनामुळे निधन झाले होते.

ताम्हाणे दाम्पत्याची मुलगी आरती यांनी आईचे निधन झाल्यानंतर कोरोनाची लागण झाल्यानंतर जनजागृती करणारी फेसबुक पोस्टही शेअर केली होती. ताम्हाणे यांच्या जाण्याने मराठी नाट्यसृष्टीला कायम मार्गदर्शकाची उणीव भासेल, अशा शब्दांत प्रदीप कबरे यांनी शोक व्यक्त केला आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामृत्यू