Join us

वीज कंपन्यांमध्ये प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्याच्या प्रक्रियेस गती मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 15:29 IST

Project affected people : नियमाप्रमाणे त्यांना सेवेत घेण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

 

मुंबई : औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी सेवेत सामावुन घेण्यासंदर्भात महापारेषण, महावितरण आणि महाजनकोच्या संपूर्ण रिक्त जागांसाठी जाहिरात देण्यात यावी. नियमाप्रमाणे त्यांना सेवेत घेण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या फोर्ट येथील कार्यालयात प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या संदर्भात नुकतेच बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी हे निर्देश दिले आहेत.राज्यातील प्रकल्पग्रस्तांपैकी जे कुशल प्रशिक्षणार्थी आहेत. त्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्यांना करार पद्धतीने प्राधान्याने सेवेत घेण्यात यावे. करार पद्धतीच्या अंतर्गत मिळत असलेले मानधन देण्यात यावे. कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून घेण्यासाठी जाहिरात देऊन पुढील प्रक्रियेस गती द्यावी.

प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होऊ नये यासाठी दहावी तसेच बारावी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना परिक्षेसाठी प्रशिक्षण द्यावे अथवा त्यांच्या शालांत पात्रतेनुसार परीक्षेचे निकष तयार करण्यात यावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.दरम्यान, ज्या शेतकऱ्यांची चोवीस तास वीज पुरवठ्याची मागणी आहे, ते शेतकरी थकबाकीची अर्धी रक्कम अदा करून नव्या दराप्रमाणे पुढील वीज देयक अदा करण्यास तयार असतील अशा शेतक-यांना तातडीने दिवसा वीज जोडणी देण्यात यावी, असे निर्देशही बैठकित देण्यात आले आहेत. 

 

टॅग्स :महावितरणमुंबईमहाराष्ट्र