कोविन ॲप असून अडचण, नसून खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 06:04 AM2021-05-08T06:04:31+5:302021-05-08T06:04:55+5:30

ज्येष्ठांना ॲपवर नोंदणी करता येत नसल्याने आणि कधी ज्यांना ती करता येते त्यांच्याबाबत सर्व्हर हँग होत असल्याने ते थेट लसीकरण केंद्रावर पोहोचत आहेत.

The problem is the Covin app, not the trap of vaccination | कोविन ॲप असून अडचण, नसून खोळंबा

कोविन ॲप असून अडचण, नसून खोळंबा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाने कोविन ॲपवर नोंदणी बंधनकारक केली आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी आता १८ वर्षांपुढील सर्व वयोगटांना लसीकरण खुले केल्यापासून ही नोंदणी नसेल तर लस देणे बंद केले आहे. मात्र, ठाण्यासारख्या सव्वा कोटी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात असंख्य अडचणी येत आहेत. यात ज्येष्ठ नागरिकांसह ग्रामीण भागातील आदिवासी जनता नाहक भरडली जात असून आधीच लसींचा तुटवडा असल्याने लसीकरणातील अडचणींत आणखी वाढ झाली आहे.

nज्येष्ठांना ॲपवर नोंदणी करता येत नसल्याने आणि कधी ज्यांना ती करता येते त्यांच्याबाबत सर्व्हर हँग होत असल्याने ते थेट लसीकरण केंद्रावर पोहोचत आहेत. मात्र, नोंदणी नसल्याने तासन‌्तास उभे राहून आरोग्य अधिकारी त्यांना परत पाठवीत आहेत. तर काही लसीकरण केंद्रे ही १८ ते ४४ वयोगटासाठीच असल्याने त्यांनाच लस दिली जात असून ४५ पुढील नागरिकांना परत पाठविले जात आहे.
nग्रामीण भागात तर नेटवर्कच मिळत नाही. आदिवासींकडे ॲण्ड्राॅईड फोन नसल्याने त्यांची नोंदणी हाेत नाही. याचाच फायदा शहरी भागातील नागरिक ॲपवर ग्रामीण भागातील केंद्राची निवड करून लस घेऊन जात असल्याने ग्रामीण जनता लसीकरणापासून वंचित राहत आहे.

लस घेऊनही प्रमाणपत्राची प्रतीक्षा
नवी मुंबई : कोरोना प्रतिबंधक लस घेण्याआधी अनेक वेळा पोर्टल धिम्या गतीने चालते. त्यामुळे नोंदणी करण्यासाठी विलंब होतो. आणी लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना प्रतीक्षा करावी लागते. तसेच लस घेऊनही प्रमाणपत्र मिळत नाही.
अनेक वेळा नागरिकांची लसीकरणासाठी नोंदणी केल्यावर काही करणास्तव त्यांचे लसीकरण होऊ न शकल्यास पोर्टलवर त्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे दिसते. त्यामुळे त्यांना पुन्हा नोंदणी करताना अडचण येते.
काही नागरिक लसीचा दुसरा डोस घेताना वेगळा मोबाईल क्रमांक देतात त्यामुळे त्यांना दुसरा डोस घेऊनही लसीचा पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र प्राप्त होते. काही नागरिक घरी स्वतःहून नोंदणी करतात तसेच लसीकरण केंद्रावर पुन्हा नोंदणी करतात त्यामुळे जेवढ्या वेळा नोंदणी केली असेल तितक्या वेळा पोर्टलवर त्यांचे नावं दिसते.

माहिती अपलाेड हाेण्यास विलंब; झेराॅक्स सेंटरही बंद
nरायगड : कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी आधीच नागरिकांची दमछाक होत आहे. जे नागरिक लस घेतात त्यांना प्रमाणपत्र मिळवताना अडचणी येत आहेत. नेट स्लो असणे, नावामध्ये बदल असणे, काही नागरिकांना प्रमाणपत्र घ्यायचे आहे याचीही कल्पना नसल्याचे दिसून येते.
nनोंदणी केल्यावर भरलेली माहिती अपलोड होण्यासाठी विलंब होत आहे, प्रमाणपत्र लसीकरणाच्या ठिकाणी मिळत नाही ते स्वतः आपणास डाउनलोड करून दिली त्याची प्रिंट घ्यावी लागते, परंतु झेरॉक्स सेंटर, सायबर कॅफे संचार बंदी असल्याने बंद आहेत, त्यामुळे नाहक त्रास हाेत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

Web Title: The problem is the Covin app, not the trap of vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.