स्ट्रीट क्राइमसह महिलांच्या सुरक्षेला देणार प्राधान्य - परमबीर सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 05:18 AM2020-03-01T05:18:02+5:302020-03-01T05:18:24+5:30

अनेक कर्तृत्ववान अधिकाऱ्यांनी मुंबईच्या आयुक्तपदाची धुरा सांभाळली असून ही जबाबदारी मिळणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे.

Priority will be given to security of women with street crime - Parambir Singh | स्ट्रीट क्राइमसह महिलांच्या सुरक्षेला देणार प्राधान्य - परमबीर सिंग

स्ट्रीट क्राइमसह महिलांच्या सुरक्षेला देणार प्राधान्य - परमबीर सिंग

Next

मुंबई : मुंबई हे देशातील सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक शहर आहे. त्याचा हा लौकिक कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून रस्त्यावरील गुन्हे(स्ट्रीट क्राइम) आटोक्यात आणण्यास महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य राहणार आहे, असे मुंबईचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितले.
मुंबईचे ७४वे आयुक्त म्हणून त्यांनी मावळते आयुक्त संजय बर्वे यांच्याकडून पदभार घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘अनेक कर्तृत्ववान अधिकाऱ्यांनी मुंबईच्या आयुक्तपदाची धुरा सांभाळली असून ही जबाबदारी मिळणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. संजय बर्वे यांनी राबविलेल्या चांगल्या योजना यापुढेही कायम ठेवल्या जातील. कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यावर भर राहणार असून महिलांसह सर्वांसाठी मुंबई २४ तास सुरक्षित शहर राहील, यासाठी सहकाऱ्यांसमवेत मिळून काम करणार आहे, मुंबईत अंडरवर्ल्ड फारसे शिल्लक राहिलेले नाही. जे काही थोडेफार असेल त्याचा बीमोड करण्यात येईल.’
मुंबई पोलीस दलाचे सर्व अधिकारी व अंमलदार एक परिवार म्हणून काम करतील, यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
>आंदोलन करणे हा नागरिकांचा अधिकार
सीएए, एनआरसीच्या विरोधात दिल्लीतील शाहीन बागच्या धर्तीवर मुंबईतही बेमुदत आंदोलन सुरू आहे. त्याबाबत विचारणा केली असता सिंग म्हणाले, ‘आंदोलन करणे हा नागरिकांचा अधिकार असून त्यामध्ये बाधा आणली जाणार नाही. मात्र त्याचा इतरांना त्रास न होण्याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे. कायद्याचे उल्लंघन करणाºयांवर निश्चितच कारवाई केली जाईल.’

Web Title: Priority will be given to security of women with street crime - Parambir Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.