राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांना पंतप्रधान मोदींची शाबासकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 03:36 IST2019-01-21T03:36:41+5:302019-01-21T03:36:54+5:30

भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी राज्यातील जनतेचा विश्वास जिंकण्याचे अभूतपूर्व कार्य केले आहे.

Prime Minister Modi's mantle to BJP workers in the state | राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांना पंतप्रधान मोदींची शाबासकी

राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांना पंतप्रधान मोदींची शाबासकी

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी राज्यातील जनतेचा विश्वास जिंकण्याचे अभूतपूर्व कार्य केले आहे. त्यामुळेच पक्षाचा या राज्यात एवढा विस्तार होऊ शकला, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी रविवारी कार्यकर्त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
हातकणंगले, कोल्हापूर, माढा व सातारा तसेच गोव्यातील दक्षिण गोवा या लोकसभा मतदारसंघांमधील भाजपाच्या बूथ कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने संवाद साधताना मोदी म्हणाले की, भाजपाचा कार्यकर्ता जुना असो वा नवा त्याच्याविषयी लोकांच्या मनात चांगली प्रतिमा असते. तळागळातील लोकांशी त्याची नाळ जुळलेली असते. भाजपाचा कार्यकर्ता देशाची आणि समाजाची चिंता वाहणारा असतो व तो सुख-दु:खाच्या वेळी धावून येतो, याची जनतेच्या मनात खात्री आहे.
कार्यकर्त्यांचा संघर्ष, पक्ष व देशाला पुढे नेण्यासाठी अहोरात्र कष्ट करण्याची त्यांची तयारी पाहिली की संतोष होतो. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच भाजपाची लोकसभेतील सदस्यसंख्या दोनवरून २८२ पर्यंत पोहोचू शकली, असे ते म्हणाले.

Web Title: Prime Minister Modi's mantle to BJP workers in the state