Join us  

विधानसभेची तयारी सुरू, राष्ट्रवादीकडून 'जाहीरनामा' समिती स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 2:56 PM

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी जाहीरनामा समितीची घोषणा केली

मुंबई - युती सरकारच्या यंदाच्या कार्यकाळातील शेवटच्या विधानसभा अधिवेशनला आज सुरूवात झाली आहे. तर, सर्वच राजकीय पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेसाठी जाहीरनामा समितीची स्थापना केली आहे. जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदी खासदार अॅड. वंदना चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी जाहीरनामा समितीची घोषणा केली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 35 जणांची जाहीरनामा समिती जाहीर केली आहे. जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदी खासदार वंदना चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. तर, समितीमध्ये सदस्य म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आ. शशिकांत शिंदे, राष्ट्रीय महिला अध्यक्ष फौजिया खान, आ. जितेंद्र आव्हाड, आ. राजेश टोपे, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार राणा जगजितसिंह पाटील, माजी खासदार संजीव नाईक, माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार आनंद परांजपे, श्रीमती उषाताई दराडे, आमदार विदया चव्हाण, आमदार विक्रम काळे-शिक्षक आमदार, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार ख्वाजा बेग, जीवनराव गोरे, आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार जयदेव गायकवाड, सारंग पाटील, सुरेश पाटील, शेखर निकम, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, मुंबई युवती अध्यक्ष अदिती नलावडे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विजय कन्हेकर आदींचा समावेश आहे. 

दरम्यान, याशिवाय विशेष निमंत्रित म्हणून पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, सुधीर भोंगळे, डॉ. मिलिंद आवाड, तर समन्वयक म्हणून प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसजयंत पाटीलमुंबईविधानसभा