मुंबईत ६७ ठिकाणी छठपूजेची जय्यत तयारी; १४८ कृत्रिम विसर्जन तलाव, ४०३ ठिकाणी चेंजिंग रूम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 13:36 IST2025-10-26T13:33:53+5:302025-10-26T13:36:11+5:30
निर्माल्य कलशासह स्वच्छतेची विशेष व्यवस्था

मुंबईत ६७ ठिकाणी छठपूजेची जय्यत तयारी; १४८ कृत्रिम विसर्जन तलाव, ४०३ ठिकाणी चेंजिंग रूम
मुंबई :मुंबई शहर आणि पूर्व व पश्चिम उपनगरे मिळून सुमारे ६७ ठिकाणी मुंबई महापालिकेने छठपूजेसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच स्वच्छ व सुरक्षित असे एकूण १४८ कृत्रिम विसर्जन तलाव/टाक्यांची सुविधाही देण्यात आली आहे. तसेच तात्पुरत्या स्वरूपात ४०३ चेंजिंग रूम उभारण्यात आले आहेत. गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने शिस्तबद्ध असे नियोजन पालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार जय्यत तयारी केली आहे.
१४८ कृत्रिम विसर्जन स्थळे
एकूण १४८ कृत्रिम विसर्जन तलाव/टाक्यांपैकी सर्वाधिक तलाव व टाक्या ह्या घाटकोपर परिसरात ४४, दहिसरमध्ये २२, तर कांदिवलीत १६ इतक्या आहेत.
उत्सवासाठी ४०३ चेंजिंग रूम उभारले आहेत. सर्व ठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि पोलिस बंदोबस्त ठेवणार आहे.
निर्माल्य कलशासह स्वच्छतेची विशेष व्यवस्था
छठपूजेच्या काळात अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी, वाहने व साधनसामग्री उपलब्ध असतील. पूजा स्थळांवर स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व धूरफवारणी यावर भर दिला जाणार आहे.
सर्व ठिकाणी पुरेशा प्रमाणात २ निर्माल्य कलश आणि तात्पुरत्या प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.