प्रवीण राऊतांची ७३ कोटींची मालमत्ता जप्त; पत्राचाळ प्रकरणी ईडीची कारवाई
By मनोज गडनीस | Updated: April 24, 2024 18:00 IST2024-04-24T17:58:05+5:302024-04-24T18:00:00+5:30
जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये प्रवीण राऊत व त्यांच्या नीकटवर्तीयांच्या पालघर, दापोली, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात असलेल्या काही भूखंडांचा समावेश आहे.

प्रवीण राऊतांची ७३ कोटींची मालमत्ता जप्त; पत्राचाळ प्रकरणी ईडीची कारवाई
मनोज गडनीस,मुंबई : गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांचे नीटकवर्तीय असलेल्या प्रवीण राऊत यांची ७३ कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने (सक्तवसुली संचालनालय) बुधवारी जप्त केली.
जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये प्रवीण राऊत व त्यांच्या नीकटवर्तीयांच्या पालघर, दापोली, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात असलेल्या काही भूखंडांचा समावेश आहे.
पत्राचाळ भूखंड आणि त्यावरील एफएसआयच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांपैकी ९५ कोटी रुपये हे प्रवीण राऊत यांना मिळाले असून त्यांनी हे पैसे त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि काही व्यावसायिकांच्या खात्यामधे फिरवल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. तसेच यातील काही रक्कम ही वैयक्तिक खात्यात वळवली होती व याच पैशांतून ठाणे, रायगड, पालघर आणि दापोली जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी केल्याचे तपासात दिसून आले. मे. प्रथमेश डेव्हलपर्स या राऊत यांच्या कंपनीने हा भूखंड खरेदी व्यवहार केला होता. नंतर ही जमीन बक्षीसपत्राद्वारे नीकटवर्तीयांच्या नावे केल्याचेही ईडीच्या तपासात दिसून आले. या घोटाळ्यातील पैशांतून या मालमत्तांची खरेदी केल्याच्या पार्श्वभूमीवर ही जप्तीची कारवाई करण्यात आल्याचे ईडीने सांगितले.