‘मॅट’च्या सदस्यपदी प्रवीण दीक्षित नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 05:50 IST2018-01-29T05:50:13+5:302018-01-29T05:50:30+5:30
निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची महाराष्टÑ प्रशासकीय प्राधिकरणाच्या (मॅट) सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

‘मॅट’च्या सदस्यपदी प्रवीण दीक्षित नियुक्त
मुंबई - निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाच्या (मॅट) सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकार व उच्च न्यायालयामार्फत पाठविण्यात आलेल्या प्रस्तावानुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नुकतीच
त्यांची निवड केली.‘मॅट’मध्ये नियुक्ती होणारेदीक्षित हे पहिले निवृत्त पोलीस अधिकारी ठरले असून त्यांच्यामुळे चार महिन्यांपासून रिक्त असलेल्यातीन पदांपैकी एक पद भरले गेले आहे.
दीक्षित यांचा साडेतीन वर्षांचा कार्यकाळ असल्याचे सूत्रांनी सांगितले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक म्हणून त्यांनी विशेष छाप पाडली होती. ‘मॅट’चे अध्यक्ष न्या. ए. एच. जोशी वगळता अन्य तीन पदे रिक्त होती.