अ. भा. नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसाद कांबळी, अमोल कोल्हेंवर केली मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 16:54 IST2018-04-06T16:54:15+5:302018-04-06T16:54:15+5:30
अ. भा. नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसाद कांबळी यांची निवड झालीय. मोहन जोशी पॅनलकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या अमोल कोल्हेंचा पराभव झाला आहे.

अ. भा. नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसाद कांबळी, अमोल कोल्हेंवर केली मात
मुंबई- अ. भा. नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसाद कांबळी यांची निवड झालीय. मोहन जोशी पॅनलकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या अमोल कोल्हेंचा पराभव झाला आहे. प्रसाद कांबळी हे 2018 पासून 2023पर्यंत अ. भा. नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी राहणार आहेत. तर अ. भा. नाट्य परिषदेच्या उपाध्यक्ष प्रशासनपदी गिरीश ओक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नाट्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाहपदी शरद पोंक्षेंची निवड झाली आहे. तर कोषाध्यक्ष म्हणून जगन्नाथ चितळे हे निवडून आले आहेत. तर सुनील ढगे, सतीश लोटके आणि अशोक ढेरे हे सहकार्यवाह म्हणून कार्यभार पाहणार आहेत. तसेच उपाध्यक्ष उपक्रम नरेश गडेकर यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. तसेच मधुरा वेलणकर, शंकर निमकर, भरत जाधव, अविनाश नारकर, शेखर बेंद्रे, राजन भिसे, मंगेश कदम, संदीप जंगम, आनंद खरवस, उज्ज्वल देशमुख, गिरीश महाजन असे 11 कार्यकारिणी समिती सदस्यही निवडून आले आहेत.