Join us

मेहतांची सातव्यांदा उमेदवारी मिळविण्यासाठी कसरत; पुत्रासाठीही प्रयत्नशील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 20:06 IST

प्रकाश मेहता यांनी आपला नसेल तर पुत्र हर्ष यांला उमेदवारी द्यावी, यासाठी टोकाचे प्रयत्न करीत आहेत.

- जमीर काझी 

मुंबई : महानगरातील भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या घाटकोपर(पूर्व) विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री व विद्यमान आमदार प्रकाश मेहता हे सलग सातव्यादा उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. वादग्रस्त प्रतिमेमुळे त्यांना डावलून नवा चेहरा द्यावा, अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांतून होत आहे. त्यामुळे मेहता यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. 

प्रकाश मेहता यांनी आपला नसेल तर पुत्र हर्ष याला  उमेदवारी द्यावी, यासाठी टोकाचे प्रयत्न करीत आहेत.  गुजराती मताचे प्राबल्य असल्याने भाजपा आणि काँग्रेसकडून याच समाजातील उमेदवार दिला जाईल, हे निश्चित आहे, भाजपाचा वरचष्मा असलेल्या या मतदारसंघात मेहता यांची पुन्हा एकदा आमदार व्हायची इच्छा आहे, मात्र मुख्यमंत्री देवेद फडणवीस यांच्या मनातून उतरले असल्याने त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता धुसर आहे.

  मेहता यांना त्याची  कल्पना असल्याने त्यांनी पुत्र हर्ष यांचे नाव पुढे केले आहे. मात्र भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी घराणेशाहीला विरोध दर्शवला जात आहे. त्यामुळे पार्टी खरेच नवा चेहरा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :विधानसभा निवडणूक 2019प्रकाश मेहताभाजपादेवेंद्र फडणवीस