Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंनी घेतली नवाब मलिकांची भेट; कोणत्या गटात जाणार? चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 06:09 IST

नवाब मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन मिळाल्यानंतर ते कुणाबरोबर जाणार अशी चर्चा सुरू होती.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : तुरुंगातून सुटलेल्या नवाब मलिक यांची  मंगळवारी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी भेट घेतली. सोमवारी खा. सुप्रिया सुळे यांनी  मलिक यांची भेट घेतली होती.

मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन मिळाल्यानंतर ते कुणाबरोबर जाणार अशी चर्चा सुरू होती. त्यातच दोन्ही गटातील नेत्यांनी त्यांची भेट घेतल्याने प्रत्येक गट त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. मलिक यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी त्यांना भेटलो. या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही, असे या भेटीनंतर पटेल यांनी सांगितले. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, अजूनही त्यांना उपचाराची गरज आहे, असे सांगत आम्ही त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत. अजित पवारही त्यांच्याशी बोलतील, असे पटेल म्हणाले. मालिकांनी प्रकृतीकडे लक्ष द्यावे, असे सोमवारी सुप्रिया सुळे यांनी भेट घेतल्यानंतर सांगितले होते.

 

टॅग्स :प्रफुल्ल पटेलप्रफुल्ल पटेलनवाब मलिकसुनील तटकरे