केईएममधील बांधकामामुळे रुग्णांचे हाल

By admin | Published: May 29, 2014 02:29 AM2014-05-29T02:29:31+5:302014-05-29T02:29:31+5:30

केईएम रुग्णालयात एक ७० वर्षीय वृद्ध महिला मुलाचा आधार घेऊन हळूहळू जिना चढत होती.

Practices of patients due to construction in KEM | केईएममधील बांधकामामुळे रुग्णांचे हाल

केईएममधील बांधकामामुळे रुग्णांचे हाल

Next

पूजा दामले, मुंबई - केईएम रुग्णालयात एक ७० वर्षीय वृद्ध महिला मुलाचा आधार घेऊन हळूहळू जिना चढत होती. तिला कानाची तपासणी करून घेण्यासाठी पहिल्या मजल्यावर असणार्‍या कान - नाक - घसा बाह्यरुग्ण विभागामध्ये जायचे होते. हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. गेल्या एक वर्षापासून येथे बांधकाम सुरू असून या इमारतीची लिफ्ट बंद असल्यामुळे याचा त्रास बाह्यरुग्ण विभागामध्ये येणार्‍या रुग्णांना होतो. याच बांधकामामुळे केईएम रुग्णालयातील २५ सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. केईएम रुग्णालयाच्या गेट क्रमांक २ च्या समोरच १६ नंबर (तळमजला) मध्ये केस पेपर काढून दिला जातो. याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर दंत, कान - नाक - घसा, मेंदू विकारशास्त्र, त्वचा या विभागांचे बाह्यरुग्ण विभाग आहेत. काही कारणास्तव त्वचा विभागाचा बाह्यरुग्ण विभाग दुसरीकडे हलवण्यात आला आहे. त्वचा विभागामध्ये आता लेसर आणि इतर उपचार केले जातात. या प्रत्येक विभागाच्या बाह्यरुग्ण विभागामध्ये रोज सरासरी २५० ते ३०० रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्ण उपचारासाठी जिथे जात असतील त्या इमारतीची लिफ्ट बंद ठेवणे योग्य नसल्याचे रुग्णालयीन अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. केईएम रुग्णालयामध्ये एकूण ४४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र सध्या यापैकी १९ सीसीटीव्ही कॅमेरे चालू आहेत. उर्वरित २५ सीसीटीव्ही कॅमेरे हे बंद आहेत. बांधकाम सुरू असल्यामुळे त्या त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या वायर कापून टाकल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. केईएम रुग्णालयामध्ये गेल्या दीड ते दोन वर्षांपासून काम सुरू आहे. काम संपत नसल्यामुळे येथील रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबतीत केईएम रुग्णालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर यांच्याशी फोन आणि मेसेजद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारे उत्तर दिलेले नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Practices of patients due to construction in KEM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.