प्रभादेवी स्थानकावरील ब्रिज मार्चमध्ये पाडणार, KEM रुग्णालयाकडे जाणाऱ्यांना फटका बसणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 17:19 IST2025-02-07T17:18:25+5:302025-02-07T17:19:24+5:30

शिवडी-वरळी न्हावाशेवा उन्नत मार्गिका प्रकल्पाच्या कामासाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल पाडण्याबाबत नुकतीच महापालिका, टाटा, जिओ यांच्या संयुक्त बैठक पार पडली

Prabhadevi station bridge will be demolished in March affecting those going to KEM Hospital | प्रभादेवी स्थानकावरील ब्रिज मार्चमध्ये पाडणार, KEM रुग्णालयाकडे जाणाऱ्यांना फटका बसणार!

प्रभादेवी स्थानकावरील ब्रिज मार्चमध्ये पाडणार, KEM रुग्णालयाकडे जाणाऱ्यांना फटका बसणार!

मुंबई

शिवडी-वरळी न्हावाशेवा उन्नत मार्गिका प्रकल्पाच्या कामासाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल पाडण्याबाबत नुकतीच महापालिका, टाटा, जिओ यांच्या संयुक्त बैठक पार पडली असून मार्चमध्ये पूल पाडण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. त्यामुळे परळ येथील डॉ. आंबेडकर मार्ग आणि लगत सुरू असलेली कामे महिनाअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. 

पालिकेचे अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोईवाडा वाहतूक विभाग आणि उपयोगिता संस्थेचे प्रतिनिधी यांनी नुकतीच या पुलाची संयुक्त पाहणी केली. यावेळी पालिकेचे सहायक अभियंता रस्ते एफ दक्षिण विभाग, टाटा पॉवर कंपनी व सहाय्यक अभियंता (जलकामे), एफ दक्षिण कार्य. अभियंता (प्रचलन व परिरक्षण) मलनि:सारण कार्य. अभियंता बांधकामे, जिओ यांना चालू असलेली कामे २८ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

कामे पूर्ण करण्याचे आदेश
१. संबंधित विभागांशी झालेल्या चर्चेनुसार प्रभादेवी रेल्वे पूल एक महिन्यानंतर पाडण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. 
२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड आणि त्या लगतच्या सर्व रस्त्यांवरील चालू असलेली कामे महिनाभरात पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.

प्रभादेवी पूल पाडल्यानंतर तेथील वाहतूक सुरळीत करण्यात येईळ. तसेच आणखी रस्ते खोदण्यास परवानगी न देण्याचाही आदेश देण्यात आला आहे.

Web Title: Prabhadevi station bridge will be demolished in March affecting those going to KEM Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.