Join us  

मुंबईतल्या वीज यंत्रणेचे आधुनिकीकरण सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानानुसार झाले पाहिजे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 6:29 PM

Power in Mumbai : आधुनिकीकरणाची गरज वीज खंडित घटनेमुळे समोर आली.

मुंबई : महापारेषणची सब स्टेशन, ट्रान्समिशन लाईन आदी यंत्रणेच्या आधुनिकीकरणाची गरज मुंबईच्यावीजखंडित घटनेमुळे समोर आली आहे. त्यामुळे नजीकचे नियोजन, दीर्घकालिन नियोजनात सांगड घालून आधुनिकीकरणाच्या उपाययोजना तात्काळ हाती घ्याव्या लागतील. करावयाचे काम आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आणि सध्याच्या सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानानुसार झाले पाहिजे, असे मत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मांडले. एमएसईबी होल्डींग कंपनी सभागृहात पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते.

ट्रान्सफॉर्मस नादुरुस्त होण्याचे, ऑईल खराब होणे या समस्यांवर तात्काळ उपाययोजना कराव्यात. वीजेची मागणी आणि पुरवठा याचे योग्य नियोजन होण्यासाठी जिल्हा पातळीवरच त्याचा आराखडा तयार केला पाहिजे. सर्वच क्षेत्रासाठी सुरळीत वीजपुरवठा होण्यास भविष्यातील मागणीचा अंदाज करण्याची व्यवस्था जिल्हा पातळीवरच झाले पाहिजे. तसा प्रस्ताव करावा, असे निर्देश देण्यात आले.  महावितरणच्या उपकेंद्रांवर अतिरिक्त भार झाल्यामुळे ट्रान्सफॉर्मर्स नादुस्त होत आहेत. ओव्हर लोडचे व्यवस्थापन करण्यासाठी उपकेंद्रांच्या जवळपास लघु सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी नियोजन करण्यात यावे. ट्रान्समिशन लाईन व अन्य दुरुस्त्यांचे नियोजन हवामान विभागाचे अंदाज लक्षात घेऊन करावे. मनोरे तसेच लाईनच्या पाहणी, दुरुस्तीसाठी ड्रोनचा प्रभावी वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :वीजमुंबईसरकारभारनियमनमहाराष्ट्र