Mumbai Electricity: ग्रीड फेल झाल्यानं MMR मधील अनेक भागांत वीज पुरवठा खंडित; परीक्षांमुळे विद्यार्थी-पालक काळजीत

By कुणाल गवाणकर | Published: October 12, 2020 10:33 AM2020-10-12T10:33:22+5:302020-10-12T11:09:58+5:30

Mumbai Navi Mumbai Thane Power Cut: वीज खंडित झाल्यानं विद्यार्थ्यांना फटका; ऑनलाईन शिक्षणात अडथळा. अनेक लोकलदेखील थांबल्या. वीज पुरवठा सुरळीत होण्यास किमान एक तासाचा अवधी लागू शकतो.

Power cut in Mumbai thane navi mumbai Trains Stopped student suffers | Mumbai Electricity: ग्रीड फेल झाल्यानं MMR मधील अनेक भागांत वीज पुरवठा खंडित; परीक्षांमुळे विद्यार्थी-पालक काळजीत

Mumbai Electricity: ग्रीड फेल झाल्यानं MMR मधील अनेक भागांत वीज पुरवठा खंडित; परीक्षांमुळे विद्यार्थी-पालक काळजीत

Next

मुंबई: मुंबईसह आसपासच्या शहरांमधील वीज पुरवठा खंडित झाला आहे. ग्रीड फेल झाल्यानं बत्ती गुल झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीतील वीज पुरवठा खंडित झाल्यानं ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय अनेक लोकलदेखील थांबल्या आहेत. वीज पुरवठा सुरळीत होण्यास किमान एक तासाचा अवधी लागू शकतो.

मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये महावितरण, अदानी, बेस्टच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येतो. या सगळ्याच शहरांमधील वीजपुरवठा एकाच वेळी खंडित झाल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. विशेषतः विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. विद्यापीठ विभागाच्या व आयडॉल परीक्षा १८ तारखेपर्यंत नाहीत. मात्र, महाविद्यालयीन स्तरावरच्या परीक्षांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा यंदा क्लस्टर पद्धतीने होत असल्यानं लीड महाविद्यालय आणि त्यातील इतर महाविद्यालयं ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेत आहेत. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे विशेषतः ११ ते १२ या वेळेतील आणि पुढील सत्रातील परीक्षा रद्द केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. 

महापारेषणच्या कळवा-पडघा जीआयएस केंद्रात सर्किट १ ची देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट-२ वर होता. मात्र, सर्किट २ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं मुंबई आणि ठाण्यातील बहुतांश भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. तो पूर्ववत करण्याचं काम सुरू आहे. विद्यार्थ्यांसोबतच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही या पॉवर कटचा फटका बसला. कारण या बिघाडामुळे लोकल सेवाही ठप्प झाली आहे. 

 

Web Title: Power cut in Mumbai thane navi mumbai Trains Stopped student suffers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.