मुंबई : गेल्या आठ दिवसांत ऐन विमान प्रवासादरम्यान मोबाईल पॉवर बँकचा स्फोट झाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. त्यानंतर आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमानातून पॉवरबैंक नेता येईल का, याचा विचार करीत या संदर्भात नवीन आहेत. नियमावली आणण्याचे संकेत दिले.
गेल्या आठवड्यात इंडिगोच्या दिल्ली ते दिमापूर आणि एअर चायना अशा दोन विमान कंपन्यांच्या विमान प्रवासादरम्यान प्रवाशांकडील लिथियम मोबाइल पॉवरबँकचा स्फोट होऊन छोटेखानी आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मोबाईल पॉवरबैंकसदंर्भात काय नियमावली आहे, याचा अभ्यास डीजीसीएचे अधिकारी करीत असून, त्यानंतर यासंदर्भात निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. या संदर्भात डीजीसीएचे अधिकारी लवकरच विमान कंपन्यांच्या, तसेच सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशीदेखील चर्चा करणार आहेत.