नागपाड्यात दुमजली इमारतीचा काही भाग कोसळला; ढिगाऱ्याखाली ३-४ जण अडकल्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 15:12 IST2020-08-27T15:10:18+5:302020-08-27T15:12:30+5:30
महापालिकाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी; मदतकार्य सुरू

नागपाड्यात दुमजली इमारतीचा काही भाग कोसळला; ढिगाऱ्याखाली ३-४ जण अडकल्याची भीती
मुंबई: महाडमधील पाच मजली इमारत कोसळल्याची घटना ताजी असताना आता मुंबईतील नागपाड्यातील इमारतीचा काही भाग कोसळला आहे. कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली काही दण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मिश्रा इमारतीचा काही भाग दुपारी एकच्या सुमारास कोसळला. त्यानंतर महापालिका आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
नागपाड्यातील शुक्ला रस्त्याशेजारील आयेशा हॉटेलजवळ असलेल्या मिश्रा इमारतीचा काही भाग एकच्या सुमारास कोसळला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस आणि महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या दुर्घटनास्थळी मदतकार्य सुरू असून तीन-चार जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.