खड्ड्यांनी लावली नगरसेवकांची वाट, ‘४८ तासांचे’ आश्वासन धुळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 04:58 AM2018-07-12T04:58:28+5:302018-07-12T04:58:40+5:30

सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईचे रस्ते खड्ड्यात गेले आहेत. घाटकोपर, सायन, जोगेश्वरी, अंधेरी, शहर भागातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

 The potholes were rolled out to corporators, '48 hours' dirt assured | खड्ड्यांनी लावली नगरसेवकांची वाट, ‘४८ तासांचे’ आश्वासन धुळीत

खड्ड्यांनी लावली नगरसेवकांची वाट, ‘४८ तासांचे’ आश्वासन धुळीत

Next

मुंबई : सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईचे रस्ते खड्ड्यात गेले आहेत. घाटकोपर, सायन, जोगेश्वरी, अंधेरी, शहर भागातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मात्र, ४८ तास नव्हेतर चार-चार दिवस खड्डे भरले जात नसल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने नगरसेवकांची झोप उडाली आहे.
मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी पालिकेने झीरो पॉटहोल्स टॉलेरेन्स मोहीम जाहीर केली आहे. मात्र मुसळधार पावसाने या मोहिमेचा फज्जा उडवला आहे. याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीतही उमटले. खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास त्या विभागाच्या अधिकाºयावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली.

शिवसेनेची सारवासारव
खड्डेप्रश्नी विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरले. मुंबईत केवळ दोन हजार खड्डे असल्याचा पालिकेचा दावा आहे. मात्र, माझ्या एकट्याच्या विभागातच तीनशेहून अधिक खड्डे असल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले. यावर रस्ते विभागाचे अधिकारी स्पष्टीकरण देत असताना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हरकतीचा मुद्दा राखून ठेवत पुढच्या बैठकीत लेखी उत्तर देण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

नगरसेवकांवर खड्डे भरण्याची वेळ
नागपाडा परिसरात रस्ते खड्ड्यात गेले आहेत. याबाबत तक्रार केल्यास अधिकारी फोन घेत नाहीत. तक्रार आल्यानंतर ४८ तासांत खड्डे बुजविण्याचे आश्वासन प्रशासन देते. मात्र चार-चार दिवसही खड्डे बुजविले जात नाहीत. त्यामुळे यापुढे खड्डे त्वरित न भरल्यास आम्हीच ते भरून अधिकाºयांचा नाकर्तेपणा दाखवून देऊ, असा इशाराच समाजवादीचे गटनेते रईस शेख यांनी दिला आहे. तर आता सोशल मीडिया आणि रेडिओ जॉकीही खिल्ली उडवित असल्याची व्यथा राजश्री शिरवाडकर यांनी व्यक्त केली.

...तर खड्ड्यांना अधिकाºयांचे नाव
घाटकोपर परिसरातील सर्व रस्ते खड्ड्यात आहेत. कोल्डमिक्स तंत्रज्ञानाचा प्रयोगही तेथे फेल गेला आहे. सोशल मीडियातून नगरसेवकांनाच टार्गेट केले जात आहे. त्यामुळे खड्डे दुरुस्त न केल्यास यापुढे खड्ड्यांना एका-एका अधिकाºयाचे नाव देण्यात येईल. ही नावेही कमी पडून उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्तांचे नावही खड्ड्यांना द्यावे लागेल, असा टोला राष्ट्रवादीच्या राखी जाधव यांनी लगावला.

खड्ड्यांसाठी विशेष पथक
- प्रत्येक विभागामध्ये तक्रारीसाठी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक
- तातडीच्या कामांसाठी प्रत्येक विभागामध्ये विशेष अभियंता आणि कर्मचाºयांचे पथक
- रस्त्याच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक - १८००२२१२९३
- प्रत्येक विभागात फलक लावून जनजागृती

खड्ड्यांच्या आकड्यांवरून वाद
मुंबईत केवळ दोन हजार खड्डे आहेत, अशी आकडेवारी समोर येत आहे. प्रत्यक्षात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक विभागांतील रस्ते खड्ड्यात गेले असल्याच्या तक्रारी करीत प्रशासनाचा आकडा फसवा असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.

Web Title:  The potholes were rolled out to corporators, '48 hours' dirt assured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.