Join us  

नोकरीचे अमिष दाखवून तरुणीशी असभ्य वर्तन, आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 1:44 AM

गिरगावात राहणाऱ्या एका २३ वर्षीय मुलगी कामाच्या शोधात असताना अचानक एका मैत्रीणीनं तिला के.के. हेव्ही लिफ्टर कंपनीत नोकरी असल्याचं सांगितल.

मुंबई - नोकरी देण्याचे आमिष दाखूवन तरुणीला भेटायला बोलवून तिच्याशी असभ्य वर्तन करणाऱ्या आरोपीला मुंबईच्या यलोगेट पोलिसांनी अटक केली. कलीम खान असे आरोपीचं नाव असून तो सध्य यलो गेट पोलिसांच्या ताब्यात आहे. एका 23 वर्षीय मुलीला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर असभ्य वर्तन केल्याचा आरोप कलीम खानवर आहे. 

नेमक प्रकरण काय

गिरगावात राहणाऱ्या एका २३ वर्षीय मुलगी कामाच्या शोधात असताना अचानक एका मैत्रीणीनं तिला के.के. हेव्ही लिफ्टर कंपनीत नोकरी असल्याचं सांगितल. त्या मैत्रिणीनं पीडित तरूणीला कंपनीचा फोन नंबरही दिला. त्यानंतर तिनं कलीम खान याला फोन करून नोकरीसाठी इच्छुक असल्याचं सांगितल. त्यावेळी कलीम खान याने पिडीत तरूणीला शिवडीजवळील दारूखान्याच्या परिसरात बोलवलं असता, सध्या शक्य नसल्याचे पीडित तरूणीनं सांगितले. तर, १० जानेवारीला कलीमला पुन्हा फोन केला. त्यावेळी त्या दोघांच यलो गेट येथील भाऊचा धक्का परिसरात भेटाण्याच ठरलं. ठरल्याप्रमाणे पीडित तरूणी यलो गेट परिसरात भेटण्यास आली. त्याचवेळी आरोपीनं तिला गाडी बसण्यास सांगितलं. तरूणीनं नकार देताच आपण बाहेर भेटू असं त्याला सांगितले. परंतु, थातूर मातूर कारण देत त्याने पीडित तरूणीला गाडीत बसण्याचा आग्रह केला. गाडीत बसल्यानंतर आरोपी कलीम खानने तिला भाऊचा धक्का परिसरात नेत गाडी निर्जनस्थळी उभी केली. त्यानंतर त्याने तिच्याशी असभ्य वर्तन केले. वेळीच तरुणीने मोठ्या हिमतीने खानला प्रतिकार करत स्वत:ची सुटका करून घेतली. खान पळ काढत असताना  यलोगेट पोलीस ठाण्याची मोबाइल 5 ही कार घेऊन पोलिस शिपाई प्रशांत देशमुख आणि महिला पोलिस शिपाई पुष्पा गावित यांच्याकडे मदत मागितली. त्यानुसार महिला पोलिस शिपाई पुष्पा गावित यांनी पाठलाग करून खानला पकडले. याप्रकरणी यलोगेट पोलिस ठाण्यात खान विरोधात  354 भा.द.वी नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

पोलिस चौकशीत खानच्या मोबाइलमध्ये पीडित तरुणीचे फोटो ही आढळून आले असून ते त्याने व्हाँट्स अँप डिपीवरील असल्याचे सांगितले. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिस यलोगेट पोलिसांनी दिली.  

टॅग्स :गुन्हेगारीपोलिसमुंबई