जे. जे. रुग्णालयाजवळ बिल्डिंगचा भाग कोसळला, एक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 08:02 IST2019-07-28T08:02:35+5:302019-07-28T08:02:43+5:30

मुंबईतल्या जे. जे. रुग्णालयाजवळ नंद विलास इमारतीचा काही भाग कोसळला आहे,  

portion of ceiling collapsed in nand vilas building near j j hospital mumbai | जे. जे. रुग्णालयाजवळ बिल्डिंगचा भाग कोसळला, एक जखमी

जे. जे. रुग्णालयाजवळ बिल्डिंगचा भाग कोसळला, एक जखमी

 मुंबईः मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असून, अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबल्याचं चित्र आहे. त्यातच आता मुंबईतल्या जे. जे. रुग्णालयाजवळ नंद विलास इमारतीचा काही भाग कोसळला आहे,  इमारत जुनी असल्याने रिकामी करण्यात आली होती, आत एक मुलगा फसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या इमारतीच्या गच्चीचा काही भाग कोसळला. जे. जे. रुग्णालयाजवळ मौलाना शौकत अली रोडवर जवळपास पहाटे 4 वाजताच्या दरम्यान नंद विलास इमारतीचा काही भाग निखळला. या दुर्घटनेत एक जण जखमी आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाची गाडी दाखल झाली असून, बचावकार्य सुरू केलं आहे.

 

Web Title: portion of ceiling collapsed in nand vilas building near j j hospital mumbai