ऑनलाइन वर्गात अश्लील चाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:06 IST2021-09-25T04:06:03+5:302021-09-25T04:06:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ऑनलाइन वर्ग सुरू असताना अचानक पॉर्न व्हिडीओ लागल्याची घटना शाहूनगर परिसरात घडली. या प्रकरणी ...

Pornography in the online classroom | ऑनलाइन वर्गात अश्लील चाळे

ऑनलाइन वर्गात अश्लील चाळे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ऑनलाइन वर्ग सुरू असताना अचानक पॉर्न व्हिडीओ लागल्याची घटना शाहूनगर परिसरात घडली. या प्रकरणी शाहूनगर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका नामांकित महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे. नववीचा क्लास सुरू असताना हा प्रकार घडला आहे. अल्पवयीन मुलांना दिलेल्या झूम आयडीद्वारे आरोपीने प्रवेश करून हे कृत्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे महाविद्यालय ऑनलाइन वर्ग घेत आहेत. दरम्यान, गुरुवारी एका अज्ञात तरुणाने ऑनलाइन क्लासच्या यंत्रणेत सहभागी होऊन हे खोडसाळ कृत्य केले आहे. या प्रकरणी शाहूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.

तर नुकतेच साकीनाका येथे खासगी ऑनलाइन वर्ग सुरू असताना सायबर बुलिंगसाठी अश्लील कृत्य करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला राजस्थानमधून ताब्यात घेतले होते.

....

२७ जून : विलेपार्ले येथील एका नामांकित महाविद्यालयात ऑनलाइन वर्ग सुरू असताना अज्ञात सायबर हॅकरने यंत्रणा हॅक करत पॉर्न व्हिडीओ लावला. या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

....

Web Title: Pornography in the online classroom