Join us

डाळिंबाच्या दाण्यांना मोत्याचा भाव, दरवाढीमागे कारण काय? कुणी अजिबात खाऊ नये हे फळ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 12:19 IST

उन्हाळा आणि पाण्याच्या तुटवड्यामुळे यंदा डाळिंबाच्या उत्पादनात घट झाली आहे.

मुंबई

उन्हाळा आणि पाण्याच्या तुटवड्यामुळे यंदा डाळिंबाच्या उत्पादनात घट झाली आहे. त्याची आवक घटल्याने किंमतीत वाढ झाली आहे. परिणामी, डाळिंबाच्या दाण्यांना मोत्याचा भाव आल्याचे पाहायला मिळत आहे. 

उकाड्यामुळे मागणीत वाढजुलै उजाडला तरी मुंबईत सलग पाऊस झालेला नाही. त्यामुळे उकाडा जाणवत आहे. परिणामी, डाळिंबासारख्या फळांची मागणी वाढली आहे. परिणामी त्याच्या किमतीत वाढ झाल्याचे विक्रेते सांगतात. 

१० ते १५ टक्के वाढ१. डाळिंबाच्या दरात १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळत असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. 

२. दुसरीकडे डाळिंब आरोग्यदायी असल्याने ग्राहक ते जादा पैसे मोजून विकत घेताना दिसत आहेत. 

सलाड, टॉपिंग्स, ज्यूससाठी वापरडाळिंबाचे दाणे काढून खाण्यासह विविध सलाड तसेच टॉपिंग्ज म्हणून त्याचा वापर केला जातो. ज्यूसलाही अनेकांचे प्राधान्य असते. 

डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सेवन करामूत्रपिंडाचा आजार किंवा मधुमेह असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या पोटॅशियम आणि सारखेच्या प्रमाणामुळे डाळिंब कमी प्रमाणात सेवन करावे. तसेच रक्त पातळ होणारी औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी याचे शेव डॉक्टरांना विचारुन करावे, असे तज्ज्ञ सांगतात. 

आरोग्यदायी फायदेहृदयरोगापासून संरक्षण- डाळिंबामध्ये प्युनिकॅलाजिन्स आणि अँथोसायनिन्स सारखे अँटिऑक्सिडंट्स विपुल प्रमाणात आहेत. ते वाईट कोलेस्ट्रॉल कमी करुन चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. रक्तदाब कमी करुन हृदयरोगापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात. 

अँटीऑक्सिडंट पॉवर- डाळिांबामध्ये पॉलिफेनॉलसह उच्च पातळीचे अँटीऑक्सिडंट्स असून ते मुक्त रॅडिकल्सशी लढतात आणि पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. परिणामी दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होतो. 

मेंदूचे आरोग्य- डाळिंब मेंदूतील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करून स्मृती आणि संज्ञानात्मक कार्य सुधारू शकते. 

पचन- डाळिंबाताली फायबरचे प्रमाण पचनास फायदेशीर ठरते. त्यामुळे बद्धकोष्ठता रोखण्यास मदत होते. 

कर्करोग प्रतिबंध- डाळिंबातील अँटीऑक्सिडंट व दाहक-विरोधी संयुगे प्रोस्टेट आणि स्तनाच्या कर्करोगाविरुद्ध उत्तमरित्या काम करतात. 

डाळिंबाची किंमत८० ते १२० गावठी डाळिंब (प्रति किलो)१५० ते २०० मोठे डाळिंब (प्रति किलो)

टॅग्स :फळेमुंबई