Join us

विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 10:39 IST

Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील 'पॉलिमर केमिस्ट्री रिसर्च लॅबोरेटरी'चे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी युरोफिन्सच्या सीएसआर निधीचा हातभार लागला असून त्यातून या प्रयोगशाळेत अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील 'पॉलिमर केमिस्ट्री रिसर्च लॅबोरेटरी'चे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी युरोफिन्सच्या सीएसआर निधीचा हातभार लागला असून त्यातून या प्रयोगशाळेत अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेमुळे पॉलिमर, बॅटरी मटेरियल्स आणि अनुप्रयुक्त विज्ञान क्षेत्रातील संशोधनाला नवचैतन्य मिळणार आहे. त्याचबरोबर रसायनशास्त्र विभागाची संशोधन क्षमता वाढून पॉलिमर संशोधन, स्मार्ट कोटिंग्ज, बॅटरी आणि नॅनोमटेरियल्स या क्षेत्रांत नवे प्रगत संशोधन घडण्यास मदत मिळेल.

मुंबई विद्यापीठात प्रथमच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत बाह्य निधीतून प्रयोगशाळेचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या सहकार्यामुळे यामुळे उद्योग-शैक्षणिक सहकार्य मोठ्या प्रमाणात वृद्धिंगत होणार आहे. या प्रयोगशाळेचे उद्घाटन नुकतेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी आणि युरोफिन्स व्यवस्थापकीय संचालक डॉ. पंकज जैमिनी उपस्थित होते.

'युरोफिन्सच्या सीएसआर सहाय्याने झालेली ही प्रयोगशाळा विद्यापीठासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. अशा उपक्रमांमुळे वैज्ञानिक क्षमतेत वृद्धी होऊन शैक्षणिक संशोधन व औद्योगिक गरजा यात समन्वय साधला जाणार आहे. या प्रयोगशाळेमुळे संशोधकांना प्रेरणा मिळेल तसेच शाश्वत विकासासाठी मोलाचे योगदान मिळू शकेल, असा आशावाद मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai University gets new polymer chemistry lab, boosts research.

Web Summary : Mumbai University's renovated polymer chemistry lab, funded by Eurofins CSR, enhances research in polymers, battery materials, and applied science. This collaboration fosters industry-academia cooperation, promoting advanced research and sustainable development.
टॅग्स :मुंबई विद्यापीठशिक्षण