मुंबईत ५० ठिकाणी प्रदूषण नियंत्रण यंत्रणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 05:08 IST2018-04-07T05:08:20+5:302018-04-07T05:08:20+5:30
मुंबईत ५० ठिकाणी व राज्यातील पाच महानगरपालिका क्षेत्रात प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविणार असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले.

मुंबईत ५० ठिकाणी प्रदूषण नियंत्रण यंत्रणा
- विशेष प्रतिनिधी
मुंबई - मुंबईत ५० ठिकाणी व राज्यातील पाच महानगरपालिका क्षेत्रात प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविणार असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले. ते आज मंत्रालयात स्ट्राटा इनव्हिरो कंपनीतर्फे प्रदूषण यंत्रणे संदभार्तील सादरीकरण बैठकीत बोलत होते. मुंबई व्यतिरिक्त पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि चंद्र्रपूर या महापाालिका क्षेत्रात प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्ट्राटा इनव्हिरो कंपनीने प्रायोगिक तत्त्वावर देशातील बेंगलुरु, दिल्ली, गोवा आणि ठाणे येथे ही नियंत्रण यंत्रणा बसविली आहे. संपूर्ण देशात २०१९ पर्यंत शंभर शहरात ही यंत्रणा बसविण्याचे उद्दिष्ट असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमोल चापेकर यांनी सांगितले.