कांदिवलीत गावठाणच्या जागेवर राजकीय पक्षाचे कार्यालय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:05 AM2021-02-10T04:05:02+5:302021-02-10T04:05:02+5:30

फोटो आहे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गावठाण मालकी हक्काच्या जागेवर लाॅकडाऊनची संधी साधून राजकीय पक्षाचे कार्यालय बांधल्याचा आरोप ...

Political party office at Gaothan in Kandivali! | कांदिवलीत गावठाणच्या जागेवर राजकीय पक्षाचे कार्यालय !

कांदिवलीत गावठाणच्या जागेवर राजकीय पक्षाचे कार्यालय !

Next

फोटो आहे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गावठाण मालकी हक्काच्या जागेवर लाॅकडाऊनची संधी साधून राजकीय पक्षाचे कार्यालय बांधल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कांदिवलीतील तालुका अध्यक्षावर करण्यात आला आहे. त्यामुळे यावर कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा जागामालकाकडून देण्यात आला आहे.

कांदिवली पश्चिमच्या शिवाजी रोड येथे केणी हाऊस परिसरात राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस पक्षाचे पार्टी कार्यालय बांधण्यात आले आहे. कांदिवली तालुका अध्यक्ष मयूर केणी यांनी हा प्रकार केल्याचा आरोप जागामालक भालचंद्र केणींनी केला आहे. भालचंद्र हे गेल्या वर्षभरापासून पालिका आर/दक्षिण विभाग आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्याशी पत्रव्यवहार करत आहेत. अद्याप याविरोधात कारवाई करण्यात आली नसल्याने हक्काच्या जागेसाठी आता आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

केणी हाऊस, गावठण सर्व्हे नं. १२७२, १२७३ आणि १२७३ ही भालचंद्र केणी यांच्या मालकी हक्काची जागा आहे. या जमिनीवर राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस पक्षाचा कांदिवली तालुका अध्यक्ष मयूर केणी यांने बेकायदेशीर पक्षाचे दुमजली कार्यालय बांधले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच कार्यालयाच्या मागे ५ ते ६ अनधिकृत घरे बांधून ती भाडे तत्त्वावर दिल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

भालचंद्र हे वर्षभरापासून पालिका कार्यालयाच्या पायऱ्या झिजवित असूनही याकडे आर. दक्षिणच्या बांधकाम इमारत व कारखाने विभागाने दुर्लक्ष करत असल्याचाही त्यांचा आरोप आहे. भालचंद्र यांच्या आईने मयूरचे वडील शमनाथ केणी यांना राहण्यासाठी ३०० फुटाचे कच्चे झोपडे दिले होते. त्याचा गैरफायदा मयूरने घेत जागा हडपल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणातील तथ्य पडताळून योग्य ती कारवाई केली जाईल, असे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष ॲड. इंद्रपाल सिंग यांचे म्हणणे आहे.

आमच्यावर दबावतंत्राचा अवलंब

‘माझ्याविरोधात करण्यात आलेली ही तक्रार खोटी आहे. सदर मालमत्ता आमच्या मालकीची असून, प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. प्रसारमाध्यमांचा वापर करून आमच्यावर दबावतंत्राचा अवलंब केला जात आहे.

मयूर केणी, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस पक्ष, कांदिवली

Web Title: Political party office at Gaothan in Kandivali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.