'महायुती'चे प्रवीण दरेकर-राहुल शेवाळे यांच्यात रंगला 'बॉक्सिंग'चा सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 06:41 IST2026-04-03T06:39:42+5:302026-04-03T06:41:07+5:30

रहुल शेवाळे यांची झालेली निवड कायदा गुंडाळून झाल्याचा आरोप भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी विरोध केला.

Political Boxing Match Errupts Between Pravin Darekar and Rahul Shewale Over MBA Presidency | 'महायुती'चे प्रवीण दरेकर-राहुल शेवाळे यांच्यात रंगला 'बॉक्सिंग'चा सामना

'महायुती'चे प्रवीण दरेकर-राहुल शेवाळे यांच्यात रंगला 'बॉक्सिंग'चा सामना

मुंबई : महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी शिंदेसेनेचे नेते राहुल शेवाळे यांची झालेली निवड कायदा गुंडाळून झाल्याचा आरोप करत भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी विरोध केला. यावरून आ. दरेकर व शेवाळे यांच्यात राजकीय 'बॉक्सिंगचा सामना रंगला आहे.

महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष रणजित सावरकर यांनी पत्रपरिषदेत शेवाळे यांची निवड योग्य असून, आमच्या संघटनेला बीएफआयने मान्यता दिली आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये झालेली निवडणूक प्रक्रिया बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने रद्दबातल ठरवली होती. त्यानंतर, तांत्रिकदृष्ट्या कोणतीही संघटना राज्य पातळीवर कार्यरत नसल्याने खेळाडूंचे मोठे नुकसान होत होते. यासाठी कंपनी अॅक्टअंतर्गत नवी संघटना स्थापन केली.

बीएफआय निरीक्षकांच्या उपस्थितीत संघटनेची निवडणूक होऊन अध्यक्षांसह १३ पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे पूर्वीची निवड आपोआपच संपुष्टात आल्याचे स्पष्ट केले.

तसेच, ५ ते ११ एप्रिल २०२६ दरम्यान नागपूर येथे १७ वर्षांखालील ज्युनिअर राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली

दरेकर म्हणाले...

कोर्टाच्या आदेशाने चॅरिटीने प्रोसेसनुसार नोव्हेंबर २०२५ मध्ये निवडणुकीत आम्ही विजयी झालो. त्याचे शूटिंग आहे. मतदारांनी मतदान केल्याचे पुरावे आहेत. तेव्हा बॉक्सिंगचा निकाल लागला. शेवाळेच्या निवडीचा प्रकार कायदा गुंडाळून झाला. आमच्या अधिकृत निवडीनंतर त्याला अर्थ नाही. राज्यसभेवर जाता आले नाही म्हणून शेवाळे नाराज आहेत. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या माध्यमातून दिल्लीला जाता येईल, असे त्यांना वाटत असावे.

शेवाळेंचे प्रत्युत्तर

कंपनी अॅक्टनुसार आमच्या संघटनेला बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने मान्यता दिल्यामुळे कोणत्याही राजकीय वादाचा प्रश्न नाही. ५ एप्रिलला सुरू होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करू. माझ्या राजकीय भवितव्याची काळजी घेण्यासाठी आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थ आहेत. त्यामुळे माझ्या राजकीय भवितव्याची काळजी करू नका.
 

Web Title : संघ पद को लेकर दरेकर के विरोध से शेवाले के साथ 'बॉक्सिंग' मुकाबला।

Web Summary : दरेकर ने शेवाले के बॉक्सिंग एसोसिएशन चुनाव को अवैध बताया। शेवाले ने कंपनी अधिनियम और बीएफआई मान्यता के माध्यम से वैधता का बचाव किया। नेतृत्व को लेकर विवाद।

Web Title : Darekars opposition sparks 'boxing match' with Shewale over association post.

Web Summary : Darekar alleges Shewale's boxing association election was illegal. Shewale defends legitimacy via company act and BFI recognition. Disputes arise over leadership.